AmravatiLatest News

महानगरपालिका,अतिक्रमण निर्मुलन विभागाची कारवाई

अमरावती : अमरावती शहरात वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर महानगरपालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे. दिनांक, ०४/०७/२०२५ रोजी शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता पासून दुपारी ४.३० वाजेपर्यंत विलास नगर रोड, लक्ष्मी नगर रोड येथील रस्त्यावर बांधण्यात येत असलेल्या अवैध बांधकाम व झोन क्रमांक ०१ अंतर्गत शेगाव रहाटगाव रोड, सोनल कॉलनी येथील बांधण्यात आलेले अवैध बांधकाम काढण्याची कारवाई करण्यात आली.

अतिक्रमण निर्मूलन पथकाने मोहीम सुरू केली, ज्यामध्ये रस्त्यावर व फूटपाथवर अवैधरित्या कच्चे स्वरूपाचे ताडपत्रीचे व टीना चे शेड लावून अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्याचे शेड तोडण्यात येत आहे,आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. वाहतुकीस अडथळा ठरवत होते आणि या मोहिमेअंतर्गत रस्त्यांवरचे अतिक्रमण हटवले जात आहे. तसेच काही अतिक्रमण धारक हॉकर्स यांना डसबीन वापरत नसल्यामुळे जागेवरच दंड देण्यात येत आहे,
या कारवाईत, झोन क्रमांक ०१,चे सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले, उपअभियंता आशिष अवसरे, शाखा अभियंता, आनंद जोशी, जयंत काळमेघ, योगेश कोल्हे अतिक्रमण पथक प्रमुख, अन्सार अहमद, शुभम पांडे, अतिक्रमण निर्मूलन पथक कर्मचारी सोबत पोलीस कर्मचारी आणि जेसीबी मशीनचा वापर करण्यात आला, ज्यामुळे अतिक्रमणे प्रभावीपणे हटवता आली. ही मोहीम शहराच्या इतर भागांमध्येही राबवण्यात येणार आहे, जेणेकरून शहरातील वाहतूक सुरळीत होईल आणि नागरिकांना दिलासा मिळेल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button