AmravatiLatest News

“सफाई अपनाओ, बिमारी भगाओ” अभियानाअंतर्गत कठोरा नाका ते नवसारी दरम्यान प्लास्टिकविरोधी मोहिम; विक्रेत्यांना सक्त सूचना

अमरावती : महानगरपालिका उत्तर झोन क्र. १ च्या हद्दीत येणाऱ्या रामपुरी कॅम्प, प्रभाग क्रमांक ३ नवसारी अंतर्गत आज “सफाई अपनाओ, बिमारी भगाओ” या शासनाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या स्वच्छता अभियानांतर्गत मोठी कारवाई राबवण्यात आली.

मा. आयुक्त, मा. अतिरिक्त आयुक्त मॅडम, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता), व सहायक आयुक्त यांच्या आदेशानुसार कठोरा नाका ते नवसारी मार्गावरील फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते, नाश्ता विक्रेते आणि इतर फेरीविक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या.

या मोहिमेदरम्यान सर्व विक्रेत्यांना डस्टबिन वापरणे अनिवार्य असून, परिसराची स्वच्छता राखणे आवश्यक असल्याचे स्पष्टपणे बजावण्यात आले. तसेच, पुढील तपासणीत प्लास्टिक पिशव्या आढळून आल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई तसेच अतिक्रमण विरोधी कारवाई केली जाईल, असेही कठोर शब्दांत सूचित करण्यात आले.

ही कारवाई करताना ज्येष्ठ स्वच्छता निरीक्षक राजू ढिक्याव, स्वच्छता निरीक्षक विनोद टांक, आय.ए. खान तसेच बिटप्युन अधिकारी उपस्थित होते.

महानगरपालिकेच्या या पावलाचे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले असून, शहराच्या स्वच्छतेसाठी अशा कठोर कारवायांची गरज असल्याचे अनेकांनी नमूद केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button