मनपा शाळा क्रमांक ८ येथे महानगरपालिकेतर्फे “सफाई अपनाओ, बिमारी भगाओ” अभियान
अमरावती : महानगरपालिकेतर्फे “सफाई अपनाओ, बीमारी भगाओ” अभियान, एक महिन्याचा स्वच्छता मोहीम आहे, जी १ जुलै ते ३१ जुलै पर्यंत चालणार आहे. या अंतर्गत, सार्वजनिक आरोग्य धोक्यांना कमी करण्यासाठी, विशेषतः बंद नाल्या, कचरा ठिकाणे, आणि साचलेल्या पाण्याचे व्यवस्थापन केले जाईल. तसेच, स्वच्छता आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित केली जाईल.
या मोहिमेत, नागरिकांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्य धोक्यांना कमी करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातील. यामध्ये, विशेषतः झोपडपट्ट्या, शाळा आणि जास्त रहदारीच्या ठिकाणी स्वच्छता आणि हात धुण्याचे महत्त्व सांगितले जाईल.
अमरावती महानगरपालिकेने देखील १ जुलै ते ३१ जुलै पर्यंत हा अभियान सुरू केला आहे. या अंतर्गत, विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम चालवण्यात येत आहे आणि नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश, सार्वजनिक आरोग्य सुधारणे आणि संसर्गजन्य रोगांचा प्रसार रोखणे आहे असे महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सांगीतले आहे.
मा.आयुक्त सौम्या शर्मा चांडक, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ.अजय जाधव व सहा.आयुक्त भुषण पुसतकर यांचे आदेशानुसार आज दिनांक ०३/०७/२०२५ रोजी शासनाच्या निर्देशानुसार “सफाई अपनाओ, बिमारी भगाओ” या अभियानांतर्गत प्रभाग क्रमांक १३ अंतर्गत येणाऱ्या बालाजी प्लॉट येथील मनपा शाळा क्रमांक ८ येथील शिक्षिका सोबत चर्चा करुन विद्यार्थी यांना स्वच्छ हात धुणे, घर स्वच्छ, परिसर स्वच्छ याबाबत माहिती देऊन या पावसाळ्याचे दिवसामध्ये रोगराई होऊ नये याकरीता आपली स्वतःची कशी काळजी घ्यावी सर्वात महत्वाचे म्हणजे हात स्वच्छ धुणे जेवण करण्या अगोदर, जेवण केल्यानंतर, अस्वछतेचे कामे केल्यानंतर कश्या प्रकारे हात धुणे याबाबत जेष्ठ स्वास्थ निरीक्षक विजय बुरे, अमरावती शहर समन्वयक डॉ. श्र्वेता बोके यांनी विद्यार्थी मुलांना हॅन्ड व्हाश भेट देऊन माहिती दिली.
सदर ठिकाणी जेष्ठ स्वास्थ निरीक्षक विजय बुरे, SBM समन्वयक डॉ. श्र्वेता बोके, झोन क्र.२ चे स्वास्थ निरीक्षक व शिक्षिका वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते.



