विद्यापीठातील संस्कृत विभागाच्यावतीने राष्ट्रीय लिपी कार्यशाळेचे 14 व 15 जुलै रोजी आयोजन

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या संस्कृत विभागातर्फे दि. 14 व 15 जुलै, 2025 रोजी ‘राष्ट्रीय लिपी कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली आहे. भारताच्या प्राचीन लिपींचा अभ्यास करण्याची ही एक सुवर्णसंधी असून, सदर कार्यशाळेत ब्राह्मी लिपीचे वाचन व लिखाण शिकवले जाईल. ही एक विनामूल्य ऑफलाइन कार्यशाळा असून, यासाठी नावनोंदणी सुरु झाली आहे. केवळ 50 जागा उपलब्ध असल्याने इच्छुक विद्याथ्र्यांनी त्वरित आपली जागा निश्चित करावी, असे आवाहन संस्कृत विभागाच्या समन्वयक डॉ. संयोगिता देशमुख यांनी केले आहे.
या कार्यशाळेत सहभागी होऊन भारताच्या समृद्ध लिपी परंपरेची माहिती करून घ्यावी व कार्यशाळेचा जास्तीतजास्त लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाच्यावतीने करण्यात येत आहे. अधिक माहितीकरीता समन्वयक डॉ. संयोगिता देशमुख यांचेशी प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी क्रमांक 9420519946 यावर संपर्क साधता येईल.



