AmravatiLatest News

विद्यापीठातील गृहविज्ञान विभाग शैक्षणिक व विस्तार उपक्रमात अग्रेसर*

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या स्थापनेपासूनच गृहविज्ञान विभाग कार्यरत आहे. गृह विज्ञान विभाग आजतागायत शैक्षणिक व विस्तार उपक्रमामध्ये अग्रेसर आहे. विभागामध्ये विद्याथ्र्यांसाठी शिक्षण, संशोधन व विस्तार उपक्रमाच्या विविध सुविधा उपलब्ध आहेत.

सुसज्ज प्रयोगशाळा व इंटर्नशिपच्या संधी
विभागाची स्वतंत्र इमारत, वर्गखोल्या, प्रयोगशाळा, सेमिनार हॉल, कॉम्प्युटर लॅब, मेडीटेशन हॉल, लायब्रारी अशा सुविधांनी सुसज्ज आहे. विद्याथ्र्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासाठी अभ्याक्रमासह विविध विस्तार कार्यक्रम व उपक्रम विभागाव्दारे राबविले जातात. विभागाचे विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत असून अनेक शैक्षणिक व संशोधन क्षेत्रासोबतच विविध सार्वजनिक व खाजगी आस्थापना, उपक्रमांमध्ये कार्यरत आहेत. सोबतच फुड इंडस्ट्री, जिम, विस्तार कार्यक्रम, कृषी विज्ञान केंद्र, सामाजिक कार्यात असलेल्या गैरसरकारी संस्थांमध्ये विभागाच्या विद्याथ्र्यांचे प्लेसमेंट झालेले आहे. सेमिनारकरिता विद्याथ्र्यांना प्रेझेन्टेशन तयार करणे, सादरीकरणाचे कौशल्य आत्मसात करता येणे तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाची विद्याथ्र्यांना ओळख होते. विभागाच्या अभ्यासक्रमांना इंटर्नशिप लागू असून प्रतिष्ठित आस्थापनांवर विद्याथ्र्यांनी आवश्यक अशी इंटर्नशिप केलेली आहे.

अमरावती शहरातील झेनिथ हॉस्पिटल, रेडीयंट हॉस्पिटल, नागपुरातील ऑरीअस हॉस्पिटल, केअर हॉस्पिटल, किंग्जवे हॉस्पिटल येथील डायटेटिक्स विभागात आहार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे नागपूर येथील सुंदर बिस्कीट व इतर फुड इंडीस्ट्री, कृषी विज्ञान केंद्र, दुर्गापूर, दिव्य सदन, अमरावती व अन्य एनजीओमध्ये देखील विद्याथ्र्यांनी इंटर्नशिप करून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला आहे.

विस्तार कार्यक्रमांद्वारे जनजागृती
डॉ. मोतीलाल राठी यांच्याकडून प्राप्त दाननिधीतून विभागातर्फे डॉ. मोतीलाल राठी जनस्वास्थ्यासाठी जनजागृती कार्यशाळा, राष्ट्रीय पोषण अंतर्गत सप्टेंबर महिन्यात जागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन, आहार प्रदर्शनी, रोल प्ले, रॅली, घोषवाक्ये, रानभाज्यांबद्दल माहिती, तज्ज्ञांची माहितीपर भाषणे याद्वारे पोषणविषयक जनजागृती, जागतिक ह्मदय दिनानिमित्त दरवर्षी झेनिथ हॉस्पिटलच्या सहकार्याने आहार प्रदर्शनीचे आयोजन केले जाते. शाळा, महाविद्यालयांमध्ये देखील विभागातर्फे स्वच्छता व आरोग्यविषयक बाबींसाठी परिणामकारक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विद्यापीठाच्या टी.आर.डी. ई. ए. उपक्रमाअंतर्गत पाप्युलर टॉक व वर्कशॉप चे आयोजन सुध्दा केले जाते.

विभागातील अभ्यासक्रम व पात्रता
नवीन शैक्षणिक धोरणानुसार विभागात पदव्युत्तर स्तरावरचे तीन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यासाठी एम.एस्सी. इन फुड सायन्स अॅन्ड न्युट्रिशन, फुड अॅन्ड न्युट्रिशन या अभ्यासक्रमासाठी बी.एस्सी. विथ होमसायन्स, कम्युनिटी सायन्स, फॅमिली अॅन्ड कम्युनिटी सायन्स, न्युट्रिशन विथ डायटेटीक्स / अप्लाईड न्युट्रिशन / फुड सायन्स /मायक्रोबायोलॉजी /बायोकेमिस्ट्री /लाईफ सायन्स /बायोटेक्नॉलॉजी / अॅग्रीकल्चर्स बायोटेक्नॉलॉजी / बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी फुड टेक्नॉलॉजी / हॉटेल मॅनेजमेंट / बॅचलर ऑफ मेडिसीन /बी. व्होकेशनल एम. व्होकेशनल डिग्री कोर्स इन फुड प्रोसेसिंग अॅन्ड प्रीझव्र्हेशन / फुड प्रोसेसिंग अॅन्ड व्हॅल्यू अॅडीशन / हॉटेल मॅनेजमेंट / ग्रीकलचर्स फुड / प्रोसेसिंग /फुड प्रीझव्र्हेशन टेक्नॉलॉजी / फुड प्रोसेसिंग अॅन्ड मॅनेजमेंट. एम.एस.सी.इन कम्युनिकेशन एक्सटेंशन बी.एस्सी. विथ होमसायन्स, कम्युनिटी सायन्स, फॅमिली अॅन्ड कम्युनिटी सायन्स, डेव्हलपमेंट कम्युनिकेशन अॅन्ड एक्सटेंशन / बी. एस. सी. एक्सटेंशन एज्यूकेशन / बी. एस. सी. अॅग्रीकल्चर्स / बॅचलर ऑफ सोशल वर्क/ मास्टर ऑफ सोशल वर्क. बी.ए. इन मास कम्युनिकेशन बी.ए. इन रुरल डेव्हलपमेंट / ट्रायबल डेव्हलपमेंट / ट्रायबल स्टडिज. बी. व्होकेशनल /एम व्होकेशनल डिग्री कोर्स इन जर्नालीझम अॅन्ड मीडिया मॅनेजमेंट. बी. व्होकेशनल /एम. व्होकेशनल डिग्री कोर्स इन अॅग्रीकल्चर्स अॅन्ड अॅग्रीकल्चर्स सायन्स. एम.एस.सी.इन रिसोर्स मॅनेजमेंट बी.एस.सी. विथ होमसायन्स, (जनरल किंवा स्पेशलायझेशन इन रिसोर्स मॅनेजमेंट / फॅमिली रिसोर्स मॅनेजमेंट किंवा इतर स्पेशलायझेशन्स ) किंवा बी.एस.सी. कम्युनिटी सायन्स किंवा बी.एस.सी. फॅमिली अॅन्ड कम्युनिटी सायन्स, बी.बी.ए., बी. कॉम., बी. टेक. इन्टेरिअर डिझायनिंग, बी व्होकेशनल /एम. व्होकेशनल / डिग्री कोर्स इन ट्राव्हेल अॅन्ड टुरिझम /ऑफिस ओटोमेशन अॅन्ड ई सर्विसेस.

या सर्व अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून विद्यापीठाच्या www.sgbau.ac.in या वेबसाईटवर देखील विद्याथ्र्यांना पाहता येईल. प्रवेशोच्छूक विद्याथ्र्यांनी विभाग प्रमुख डॉ. वैशाली धनविजय यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठाच्यावतीने करण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button