वसंतराव नाईक जयंती व दादासाहेब खापर्डे यांची पुण्यतिथी निमित्य हारार्पण कार्यक्रम संपन्न
अमरावती : १ जुलै,२०२५ रोजी वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्य वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस हारार्पण महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक सौम्या शर्मा चांडक यांचे हस्ते महानगरपालिका कॉन्फरन्स हॉल येथे करण्यात आले. तसेच दादासाहेब खापर्डे यांच्या पुण्यतिथी निमित्य राजकमल चौकातील दादासाहेब खापर्डे यांच्या पुतळ्याला हारार्पण करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त योगेश पिठे, मुख्यलेखापरिक्षक श्यामसुंदर देव, मुख्यलेखाधिकारी दत्तात्रय फिस्के, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, नंदकिशोर तिखिले, नितीन बोबडे, धनंजय शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय जाधव, सिस्टीम मॅनेजर अमित डेंगरे, उद्यान अधिक्षक श्रीकांत गिरी, नगरसचिव संदिप वडुरकर, स्वास्थ अधिक्षक श्रीकांत डवरे, सहाय्यक निवडणूक अधिकारी अक्षय निलंगे, प्रमोद मोहोड, दिनेश खापर्डे, भुषण खडेकार, सिमंत गजभिये, अधिकारी, कर्मचारी, जेष्ठ स्वास्थ निरीक्षक, स्वास्थ निरीक्षक उपस्थित होते.



