AmravatiLatest News

मुख्यमंत्री श्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषि दिन म्हणून साजरी

अमरावती : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे प्रणेते, शेतकयांचे कैवारी श्री वसंतराव नाईक यांची जयंती संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात कृषि दिन म्हणून मोठ¬ा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन, हारार्पण करुन विद्यापीठाच्यावतीने अभिवादन केले. जयंती कार्यक्रमाला प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील, उपकुलसचिव डॉ. दादाराव चव्हाण, सहा. कुलसचिव श्री विलास काकडे तसेच विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते. संचालन व वसंतराव नाईक यांच्याबद्दल माहिती जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी दिली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button