AmravatiLatest News

महानगरपालिका आयुक्‍त सौम्‍या शर्मा चांडक यांची पुर्व झोन कार्यालय, दस्तुरनगर परिसर, छत्री तलाव रोड परिसरातील स्‍वच्‍छतेसंदर्भात प्रत्‍यक्ष पाहणी

अमरावती : महानगरपालिका आयुक्‍त सौम्‍या शर्मा चांडक यांनी आज दिनांक ०१ जुलै,२०२५ रोजी पुर्व झोन क्र.३ कार्यालय, दस्‍तुरनगर परिसर, छत्री तलाव रोड परिसरातील स्‍वच्‍छतेसंदर्भात प्रत्‍यक्ष पाहणी केली. या पाहणी दरम्‍यान आयुक्‍तांनी सदर परिसरातील स्‍वच्‍छतेबाबत आढावा घेवून संबंधीतांना निर्देशित करण्‍यात आले.

यावेळी पुर्व झोन क्र.३ कार्यालयाला भेट देत प्रत्यक्ष पाहणी करून मुख्यालयाची रचना व विभागांची व्यवस्था जाणून घेतली. सदर ठिकाणी अधिका-यांची दालने, कर्मचारी बैठक व्यवस्था यांची पाहणी करत महानगरपालिका आयुक्‍तांनी याबाबतची माहिती जाणून घेतली. सदर झोनच्‍या कर्मचा-यांमार्फत ऑनलाईन प्रणालीचा वापर करुन नागरिकांना सहकार्य करण्‍याचे निर्देश आयुक्‍तांनी दिले. यावेळी महानगरपालिका आयुक्‍त सौम्‍या शर्मा चांडक यांनी मालमत्‍ता कर विभागाची पाहणी केली.

अमरावती शहरातील बराचसा भाग सार्वजनिक बांधकाम विभाग, मजीप्रा, एमईसीबी, एमआयडीसी, रेल्वे यांच्या अखत्यारित असून शहर स्वच्छतेमध्ये त्यांचाही सक्रीय सहभाग अतिशय महत्वाचा आहे. याकरिता या प्राधिकरणांच्या संबंधित अधिका-यांची स्वच्छताविषयक कामाकडे काटेकोर लक्ष देणे ही शहराच्या मानांकनासाठी त्यांचीही जबाबदारी आहे. याकरिता या प्राधिकरणांच्या संबंधित अधिका-यांची स्वच्छताविषयक बैठक आयोजित करून त्यांचीही मनोभूमिका तयार करण्याची सूचना अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांनी केली आहे.

यावेळी महानगरपालिका आयुक्‍त सौम्‍या शर्मा चांडक यांच्यासह अधिकारी स्वच्छतेमध्ये सुधारणेच्या दृष्टीने प्रत्यक्ष स्थळभेटी देऊन स्वच्छताविषयक पाहणी करण्याचे व त्यामध्ये सुधारणेच्या अनुषंगाने तत्परतेने बदल करण्याचे निर्देश दिले.

स्वच्छतेप्रमाणेच शहर सुशोभिकरणाकडेही विशेष लक्ष देण्याविषयी सूचना करतांना नागरिकांना अमरावती शहरात येणा-या पर्यटकांना पाहण्यास आनंददायी वाटेल स्‍वरुपात चौक, मोकळ्या जागा, कचराकुंडी हटविलेल्या जागा याचे नवनव्या संकल्पना राबवून सुशोभिकरण करा असे आयुक्तानी निर्देश दिले. शहराचे वेगळेपण अधोरेखीत करणा-या अभिनव संकल्पना शहर सुशोभिकरणात राबवाव्‍यात असे त्‍यांनी प्रकर्षाने सांगितले. प्रत्येकाने आपल्याला नेमून दिलेले स्वच्छत्ता विषयक काम प्रामाणिकपणे करावे असे सूचित करीत स्वतः ठिकठिकाणी फिरून स्वच्छतेची पाहणी करणार असल्याचे व या कामात कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

स्वच्छ सर्वेक्षणातील टूल किटच्या अनुषंगाने प्रत्येक बाबीवर करावयाच्या अपेक्षित कार्यवाहीचा आयुक्तांनी मुद्देनिहाय आढावा घेतला. यामध्ये सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांची स्वच्छता, तलाव व नाले याची स्वच्छता, कचरा वर्गीकरण व संकलन, कचरा वाहतुक आणि त्यावरील प्रक्रिया, डेब्रिजचे निर्मुलन, सांडपाण्याचे व्यवस्थापन या अनुषंगाने कोणत्या गोष्टींकडे, कसे लक्ष द्यावे आणि कोणते बदल करावेत याबाबत अपेक्षित कामांची तपशीलवार माहिती देण्यात आली. स्वच्छतेच्या अनुषंगाने नियमितपणे प्रत्यक्ष पाहणी करणे व आवश्यक सुधारणा करणे हे कार्यसूत्र अंगिकारून काम करावे असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

स्‍वच्‍छता व्‍यवस्‍थापनात नागरिकांच्या प्रतिसादाला अधिक महत्व आहे. शहरातील स्वच्छता उपक्रमांमध्ये स्वच्छताप्रेमी अमरावतीकर नागरिकांचा नेहमीच उत्स्फुर्त सहभाग असतो. त्यादृष्टीने स्थानिक पातळीवर निरनिराळे उपक्रम राबवून त्यामध्ये अधिकाधिक नागरिक सहभागी व्हावेत याकरिता प्रयत्न करावेत अशा सूचना देण्यात आल्या.

या पाहणी दरम्‍यान महानगरपालिका आयुक्‍त सौम्‍या शर्मा चांडक यांनी नागरिकांशी संवाद साधला.
या पाहणी दरम्‍यान वैद्यकीय अधिकारी (स्‍वच्‍छता) डॉ.अजय जाधव, सहाय्यक आयुक्‍त भुषण पुसतकर, नितीन बोबडे, अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्‍हे, श्‍याम चावरे, जेष्‍ठ स्‍वास्‍थ निरीक्षक कुंदन हडाले, अमरावती शहर समन्‍वयक श्र्वेता बोके, स्‍वास्‍थ निरीक्षक, मनपा कर्मचारी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button