AmravatiLatest News

महानगरपालिका अतिक्रमण निर्मुलन विभागाची कारवाई

अमरावती : अमरावती शहरात वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर महानगरपालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे. दिनांक ३०/०६/२०२५ रोजी सोमवारी दुपारी राजकमल चौक ते गांधी चौक ते साबणपुरा टांगा पडाव, तसेच बस डेपो पर्यंत अतिक्रमण निर्मूलन पथकाने मोहीम सुरू केली. ज्यामध्ये रस्त्यावर व फूटपाथवर अवैधरित्या कच्चे स्वरूपाचे ताडपत्रीचे व टीना चे शेड लावून अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्याचे शेड तोडण्यात आले आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर विशेषतः राजकमल चौक ते गांधी चौक रोडवर करण्यात आली आणि इतर साहित्य वाहतुकीस अडथळा ठरवत होते. अमरावती महानगरपालिकेने शहरात अतिक्रमण मोहीम तीव्र केली आहे आणि या मोहिमेअंतर्गत रस्त्यावरचे अतिक्रमण हटवले जात आहे.

या कारवाईत, अतिक्रमण निर्मूलन पथकासोबत पोलीस कर्मचारी आणि जेसीबी मशीनचा वापर करण्यात आला, ज्यामुळे अतिक्रमणे प्रभावीपणे हटवता आली. ही मोहीम शहराच्या इतर भागांमध्येही राबवण्यात येणार आहे, जेणेकरून शहरातील वाहतूक सुरळीत होईल आणि नागरिकांना दिलासा मिळेल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button