GondiaLatest News

झेडपी शाळेत प्रवेश घेतल्यास घरपट्टी व पाणीपट्टी माफ

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळांची घटती पटसंख्या ही एक गंभीर बाब बनली असताना, अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील पुष्पनगर “अ” येथील जिल्हा परिषद शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक यांनी पुढाकार घेत एक अनुकरणीय पाऊल उचलले आहे.

घरपट्टी-पाणीपट्टी माफ आणि शिक्षणाचा पूर्ण खर्च स्वतःच्या खिशातून!
पुष्पनगर “अ” येथील शाळा ही पहिली ते चौथीपर्यंत मर्यादित असून, सद्य घडीला या शाळेत केवळ १४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. झेडपी शाळांवरील नागरिकांचा विश्वास परत मिळवण्यासाठी आणि नव्या प्रवेशासाठी प्रोत्साहन देण्यासाठी या मुख्याध्यापकाने एक वेगळा मार्ग अवलंबला आहे.

शाळेत नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यापासून सूट देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. एवढेच नव्हे तर अनाथ विद्यार्थ्यांना पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण घेण्यासाठी लागणारा पूर्ण खर्च ते स्वतःच्या पगारातून उचलणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

जिल्ह्यात चर्चेचा विषय बनलेला उपक्रम!
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील पालकांमध्ये झेडपी शाळांविषयी पुन्हा एकदा सकारात्मक भावना निर्माण झाली आहे. या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. विशेषतः शाळांना पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या शिक्षकांचा हा प्रयत्न ग्रामीण भागातील इतर शिक्षकांसाठीही प्रेरणादायी ठरतो आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button