Latest News

धारणी शहरात मोकाट जनावरांचा ठिय्यामुळे वाहतुकीचा गोंधळ, नागरिक त्रस्त

धारणी : धारणी शहरात सध्या मोकाट जनावरांचा प्रश्न अधिकच गंभीर बनला असून मुख्य रस्त्यांवरील चौकाचौकात या जनावरांचा ठिय्या लागत आहे. परिणामी, नागरिकांना रोजच्या दैनंदिन वाहतुकीत मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

धारणी शहरात केवळ एकच मुख्य रस्ता असून त्याच्या दोन्ही बाजूंना व्यापारी दुकाने आहेत. या दुकांनात खरेदीसाठी येणारे ग्राहक त्यांच्या दुचाकी आणि चारचाकी गाड्या थेट दुकाने समोर उभ्या करतात. त्यामुळे आधीच अरुंद असलेला रस्ता आणखी कमी पडतो. अशातच रस्त्यावर मोकाट जनावरे ठाण मांडून बसल्याने वाहतुकीची कोंडी होणे हे नित्याचे झाले आहे.

वाहनचालकांना वळण घेण्यास जागा नसते, आणि गडबडीत अनेकदा अपघाताचीही शक्यता निर्माण होते. पादचाऱ्यांनाही यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांमध्ये या समस्येमुळे संताप व्यक्त होत असून, प्रशासनाकडून तातडीने काही उपाययोजना होण्याची अपेक्षा आहे.

स्थानिक प्रशासन आणि नगरपंचायतीने लक्ष घालून मोकाट जनावरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहिमा राबवाव्यात, अशी मागणी नागरिक व स्थानिक व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button