छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना गौरव.
बडनेरा : स्टुडंट्स कॉन्फरन्स बडनेरा या सामाजिक संस्थेच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दहावी व बारावी परीक्षेत प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ बडनेरा येथील शासकीय विश्रामगृहात मोठ्या उत्साहात पार पडला.
सदर उपक्रम गेल्या २५ वर्षांपासून नियमितपणे राबवला जात असून, यंदाही दर्जेदार शिक्षणास प्रोत्साहन देत अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. सत्कार समारंभात विद्यार्थ्यांना भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक प्रा. सुरेश मिठी होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. बळीराम ग्रेसपुंजे, गुणवंतराव गारोडे, अर्चना बोबडे यांच्यासह अन्य मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती. प्रारंभी सरस्वती माता आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमात प्रा. सुरेश मिठी यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी गुणवत्तेच्या आधारे उंची गाठलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन केले.
सत्कारमूर्ती विद्यार्थ्यांमध्ये पुढील गुणवंतांचा समावेश होता:
- अर्चना चांदेकर
- संघवी जुमडे
- दिव्या सहारे
- मुस्कान दिलदाणी
- ज्ञानेश्वरी फुलझेले
- मसीरा अंजुम मुजीब अहमद
- श्रीकृष्ण बोकडे
- भावना राऊत
- ज्ञानेश्वरी वाघमारे
- ईश्वरी शिरभाते
- अमित पहाडे
- दुर्गा महातो
या विद्यार्थ्यांचा पालक, शिक्षक आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कार्यक्रम आयोजनासाठी पुढील कार्यकर्त्यांचे विशेष योगदान लाभले:
संजय बोबडे, रोमिना मोंटेरो, भारती पाटील, छाया बनसोड, मंदाताई कोडापे, ललिता तायडे, उज्वला काळपांडे, राजश्री कुत्तरमारे, लक्ष्मी अहिरे, चंद्रकला कोठारी, दत्ता गेडाम, धर्मशील गेडाम, किशोर खोब्रागडे, प्रवीण जैन, राजू पडसापूरे, शंभू खान, शहंशाह, सादिक अली आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयोजक संजय बोबडे यांनी केले.



