Latest News

अकोटमध्ये माळी महासंघ गुणगौरव सोहळा संपन्न,

अकोट : माळी महासंघाच्या वतीने आयोजित तालुक्यातील गुणवंत मिरीट लिस्ट मध्ये सहभाग असलेल्या विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात उल्लेखनीय सन्मान करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्घाटन स्थळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना विद्यार्थ्यांनी यशाचा अहंकार न बाळगता अभ्यासनिष्ठ राहावे असे राजेश जावरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, सौ संगीताताई अढाऊ यांनी विद्यार्थ्यांनी टक्केवारी कमी भेटले असता खचून न जाता पुन्हा कसोटीने अभ्यासामध्ये प्रयत्न करून प्रगती गाठावी व परिवारा सोबतच समाजाची मान उंच व्हावी असे मार्गदर्शन केले , मंगेश चिखले, नंदकिशोर शेगोकार, मनोज झाडे यांनी विद्यार्थ्यांनी गरीब परिस्थिती मधून यशाचे टक्केवारी वाढवून शिखर गाठावे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जगन बगाडे यांनी कॉटर्स शेती बद्दल माहिती दिली अकोट श्री कृष्ण मंदिर येथे ‘गुणगौरव सोहळा २०२५’ चे भव्य आयोजन करण्यात आले.असता माळी समाजातील गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनी १० ते १२ वर्ग व नीट या मध्ये माळी महासंघ सोहळ्यात सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सौ.संगीताताई अढाऊ मा.जि.प.अध्यक्ष व दिपक खलोकार जिल्हाध्यक्ष,मंगेश चिखले, नंदकिशोर शेगोकार यांच्या हस्ते क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले संत शिरोमणी सावता महाराज यांच्या फोटो प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून महेश गणगणे, रोहीत नाथे , सचिन बेलोकार ,मनोज झाडे ,सुनिल अंबडकार , केशव बिलबिले ,सागर बोरोडे , केशव लांडे, सुनिल लोखंडे ,कमलेश यावले कार्यक्रमा चे अध्यक्ष राजेश जावकार विभागीय अध्यक्ष उपस्थिती लाभली.

यावेळी विनोद रसे यांनी बहारदार गीत सादर करत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, १० व १२ वी,परीक्षेत उत्तुंग यश संपादन करणाऱ्या ८० हून अधिक विद्यार्थ्यांना त्यांच्या आई वडिला उपस्थिती मध्ये प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या गुणवंत सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने समाजात शिक्षण व कर्तृत्वाचा गौरव करण्याची परंपरा अधिक बळकट झाली आहे विद्यार्थ्यांना अभ्यासनिष्ठ यशाची प्रगती गाठावी ऊर्जा शक्ती कार्यक्रम समाज उपयोगी असून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी कार्यक्रम ठरला अशा कार्यक्रमाची समाजाला गरज आहे व तो सालाबाद प्रमाणे व्हावा असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

कार्यक्रम स्थळी विनय रवींद्र केवटी, ईश्वरी प्रशांत खलोकार, श्रावगी कमलेश यावले यांनी आपले मत व्यक्त केले,
या विद्यार्थी गुणवंत सोहळ्यात विशेष सहकार्य लाभले हर्षल खाजबागे, भुषण गणगणे, सचिन सुपासे, जुगल चिंचोळकार, मयुर लहाने, चेतन मुळे, प्रणव टवले, ऋषिकेश सुपाशे, अमोल निमकार , विजय नवले, अतुल अढाऊ, मंगेश टाक, अरविंद फुशे, व माळी महासंघाच्या सर्व पदाधिकारी सदस्य यांनी कार्यक्रमाला यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेतले, या कार्यक्रमाला पालक वर्ग महिला व पुरुष तसेच समाजबांधवांची विद्यार्थ्यांसाठी मोठ्या संख्येत उपस्थिती लागली होती, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश गायकी पत्रकार यांनी तर प्रास्ताविका नितीन शेगोकार सर सोबतच आभार प्रदर्शन रवींद्र पोटदुखे यांनी पार पाडले,

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button