Amaravti GraminLatest News

शुक्लेश्वर मंदिरात चोरीचा प्रकार, दानपेट्या फोडून चोरट्यांनी पळवली रक्कम

अमरावती : शुक्लेश्वर मंदिरात मध्यरात्री चोरीची मोठी घटना उघडकीस आली आहे. अमरावती जिल्ह्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथील प्राचीन शुक्लेश्वर मंदिरात अज्ञात चोरट्यांनी घुसून दानपेट्या फोडल्या आणि त्यामधील रक्कम लंपास केली. संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन चोरटे रात्री मंदिरात शिरले, त्यांनी तोंडाला रुमाल बांधलेले असून, ते थेट दानपेट्यांपर्यंत गेले आणि त्या फोडून रक्कम घेत पळ काढला. चोरीची ही थरारक दृश्ये सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसत आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, परिसरातील इतर मंदिरांमध्येही सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मंदिर प्रशासनाने याप्रकरणी स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून शोधमोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button