अमरावतीत आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वात वृक्षारोपण मोहीम सुरू – महिनाभरात ५० हजार झाडं लावण्याचा संकल्प

अमरावती : शहरात हरितक्रांतीसाठी एक सकारात्मक पाऊल उचलत आमदार रवी राणा यांनी आजपासून अमरावतीत “झाडे लावा, झाडे जगवा” या वृक्षारोपण मोहिमेला भव्य सुरुवात केली. रामवाटिका हनुमान गडी परिसर आणि छत्री तलाव येथे स्वतः झाडं लावून त्यांनी या उपक्रमाची सुरुवात केली.
या मोहिमेचा उद्देश एकाच – महिनाभरात ५० हजार झाडं लावून शहरात हरित आच्छादन वाढवणे. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी तब्बल ८०० झाडे लावण्यात आली, जे या संकल्पाच्या दिशेने एक ठोस पाऊल मानले जात आहे.
रवी राणा यांनी सांगितलं:
“प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी झाड लावावं आणि त्याचं पालनपोषण करून ते टिकवावं. पर्यावरण रक्षण ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.”
या अभियानाला शहरातील नागरिकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेक स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी, आणि नागरिकांनी पुढाकार घेतला आहे.
वृक्षारोपणाचे ठळक वैशिष्ट्ये:
- महिनाभरात ५० हजार वृक्ष लागवडीचा संकल्प
- पहिल्या दिवशी ८०० झाडे लावण्यात आली
- रवी राणा यांनी स्वतः हातात फावडे घेऊन मोहिमेला सुरुवात केली
- रामवाटिका व छत्री तलाव परिसरातून मोहिमेचा शुभारंभ
- नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग
शहरातील विविध शाळा, कॉलेजेस, आणि संस्थांमध्ये देखील ही मोहीम राबवली जाणार असून, झाडांच्या संवर्धनासाठी विशेष समित्याही नेमण्यात येणार आहेत.



