Accident NewsAkolaLatest News

अकोला राष्ट्रीय महामार्ग ५३ वर भीषण अपघात – सुदैवाने जीवितहानी टळली

अकोला : अकोल्यातील बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर आज सकाळी नागपूरहून शेगावकडे जाणाऱ्या खासगी प्रवासी बसचा अपघात झाला. कोळंबी फाट्याजवळील वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस थेट महामार्गावरील सुरक्षा भिंतीवर आदळली. या घटनेत बसचालक जखमी झाला असला, तरी बसमधील १७ प्रवासी थोडक्यात बचावले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अपघातग्रस्त बस क्रमांक MH-40-AQ-6158 नागपूरहून शेगावकडे जात होती. वळणावर भरधाव वेगात असताना चालक वैभव मेहरे यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या सीमेंटच्या सुरक्षा भिंतीवर आदळली. अपघातात बसचे मोठे नुकसान झाले असून चालक जखमी झाला आहे.

जखमी चालकास वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथक आणि ॲम्बुलन्स सेवेच्या मदतीने तत्काळ मुर्तीजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनास्थळी लगेचच विर भगतसिंग आपत्कालीन बचाव पथक दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात घेत महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button