AmravatiLatest NewsLocal News

विद्यापीठाच्यावतीने उत्कृष्ट खेळाडू, चमू व्यवस्थापक व चमू प्रशिक्षक यांचा कुलगुरूंचे शुभहस्ते सत्कार

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातर्फे सन 2024-25 मधील उत्कृष्ट खेळाडू (पुरुष व महिला), चमू व्यवस्थापक आणि चमू प्रशिक्षक यांचा सत्कार समारंभ दि. 27 जून, 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता विद्यापीठ दृकश्राव्य सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. समारंभामध्ये दक्षिण-पश्चिम विभाग, अखिल भारतीय आणि विद्यापीठ स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या खेळाडू, व्यवस्थापक व प्रशिक्षकांचा गौरव विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांचे शुभहस्ते करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे व कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होईल.

             विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाद्वारे निवड करण्यात आलेल्या उत्कृष्ट खेळाडूंचा या सत्कार समारंभात समावेश आहे.  सन 2024-25 मध्ये महाविद्यालयांतील चमूंच्या कुशल कामगिरीमुळे, चमू व्यवस्थापकांच्या नेतृत्वाखाली आणि चमू प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे खेळाडूंनी तसेच चमूंनी विविध खेळांच्या स्पर्धांमध्ये पदके व नैपुण्य प्राप्त केले असून, ही विद्यापीठासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे.

             सत्र 2024-25 मधील उत्कृष्ट खेळाडू, चमू व्यवस्थापक व प्रशिक्षकांची यादी सर्व संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य व पदव्युत्तर शैक्षणिक विभागप्रमुखांना पत्र पाठवून कळविण्यात आली असून त्यांनी आपल्या महाविद्यालयातील तसेच पदव्युत्तर शैक्षणिक विभागातील खेळाडू, चमू व्यवस्थापक व प्रशिक्षकांना सत्कार समारंभाची माहिती देऊन उपस्थित राहण्याबाबत सूचित करावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या प्रभारी संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी विद्यापीठाच्यावतीने केले आहे.
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button