AmravatiLatest NewsLocal News

विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागात एम.एस्सी. भाग-1 साठी 40 प्रवेशक्षमता

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. रसायनशास्त्र विभागात अत्याधुनिक संशोधन आणि समग्र विद्यार्थी विकास साधला जातो. विभागाने आपली प्रतिष्ठा सातत्याने कायम ठेवली असून दरवर्षी 40 विद्यार्थी आपले पदव्युत्तर शिक्षण घेतात. विज्ञान विद्याशाखा अंतर्गत पीएच.डी. प्रोग्राममध्ये सुध्दा प्रवेश देण्यात येत असतात. प्रवेश प्रक्रिया ही गुणवत्तेनुसार आणि विद्यापीठाच्या निकषांवर आधारित होते. 1990 मध्ये स्थापन झालेला रसायनशास्त्र विभाग उत्कृष्टतेचे केंद्र बनला आहे.
कुशल रसायनशास्त्रज्ञ, संशोधक, शिक्षक आणि उद्योग व्यावसायिक तयार करतो. विभागात सध्यस्थितीत कार्बनी रसायनशास्त्र (ऑर्गेनिक केमिस्ट्री) आणि अकार्बनी रसायनशास्त्र (इनऑर्गेनिक केमिस्ट्री) व भौतिकी रसायनशास्त्र (फिजिकल केमिस्ट्री) हे तीन विषय शिकविले जात असून सध्या उद्योग विश्वातील मनुष्यबळाची आवश्यकता बघता या अभ्यासक्रमात बदल करण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. विभागामध्ये पायाभूत सुविधा, वर्गखोल्या, प्रयोगशाळा, आयसीटी-सक्षम वर्गखोल्या, सुसज्ज प्रयोगशाळा, संशोधन उपकरणाने सुसज्ज आहे. प्रवेशानंतर विद्यार्थी पदव्युत्तर पदवीसाठी कार्बनी, अकार्बनी, भौतिकी रसायनशास्त्र अशा तीन विषयापैकी एक विषय निवडू शकतात. ग्रीनकेमिस्ट्री, कॅटॅलिसिस, नॅनोटेक्नॉलॉजी, कॅटॅलीसीसमध्ये नाविन्यपूर्ण संशोधनात विभाग सक्रिय आहे. विभागातील प्राध्यापकांनी नामांकित जर्नल्समध्ये पेपर्स प्रकाशित केले आहेत.
विद्याथ्र्यांना संशोधन, शासकीय प्रयोगशाळा, औषधी उद्योग, स्टील उद्योग, मटेरीअल सायन्स, मोल्युक्युल मॉडेलिंग, शिक्षण तसेच इतर अनेक उद्योग विश्वात काम करण्याच्या संधी उपलब्ध आहेत. विभागाची आणखी एक उपलब्धी म्हणजे विद्याथ्र्यांना फॉरेन्सिक विभाग, वीज निर्मिती कंपनी, खाद्य व अन्न निरीक्षक, जिओ केमिस्ट्री, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, शिक्षक म्हणून नियुक्ती मिळाली आहे. कार्यशाळा, चर्चासत्रे, राष्ट्रीय परिषदा, औद्योगिक भेटी, प्रत्यक्ष प्रशिक्षण कार्यक्रम, प्रश्नमंजुषा स्पर्धा, मॉडेल प्रदर्शनी अशा माध्यमातून विद्यार्थी विकासावर भर दिला जातो. अनेक पदवीधरांना औषध कंपन्या, शैक्षणिक संस्था, संशोधन आणि विकास प्रयोगशाळा, सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्स आणि आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांमध्ये प्लेसमेंट मिळाले आहे. तसेच नेट, गेट, सेट आणि सीएसआयआर-जेआरएफ सारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी देखील विभागाची विद्याथ्र्यांना मोठी मदत मिळते. प्रवेश घेऊ इच्छित विद्याथ्र्यांनी अधिक माहितीकरिता संपर्क साधावा, असे आवाहन विभागप्रमुख डॉ. प्रशांत गावंडे यांनी केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button