AmravatiLatest NewsLocal News

यू.जी.सी. (नेट) परीक्षेमुळे विद्यापीठाच्या उन्हाळी-2025 परीक्षा पुढे ढकलल्या, विद्याथ्र्यांनी नोंद घेण्याचे विद्यापीठाचे आवाहन

अमरावती : यू.जी.सी. (नेट) परीक्षा 25 जून ते 29 जून दरम्यान होणार आहे. त्यामुळे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी – 2025 पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून, सदर परीक्षा दि. 5 जुलै, 2025 ते 9 जुलै, 2025 दरम्यान पूर्वीच्याच नियोजित वेळेत व परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार असल्याचे परीक्षा विभागाकडून कळविण्यात आले आहे. सदर परीक्षेच्या वेळी विद्याथ्र्यांनी त्यांना देण्यात आलेले प्रवेशपत्र सोबत आणावे.
ज्या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत, त्यामध्ये एम.ए. सेमि.-4 (एन.ई.पी.) सर्व विषय, एम.ए. सेमि.-4 (एन.ई.पी.) इंग्रजी, एम.पी.ए.सेमि.-4 (एन.ई.पी.) ड्रामा थिएटर, एम.पी.ए.सेमि.-4 (एन.ई.पी.) डान्स (कथक), एम.कॉम. सेमि.-4 (एन.ई.पी.) आणि एम.एस्सी. सेमि.-4 (एन.ई.पी.) एन्व्हायर्मेंट सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर, कॉम्प्युटर सायन्स, फॉरेन्सिक सायन्स, एम.एस्सी.(एच./एस्सी.) सेमि.-4 (एन.ई.पी.) ऑल स्पेशीलायझेशन या परीक्षांचा समावेश आहे.
यासंदर्भात सर्वसंबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य, केंद्राधिकारी, महाविद्यालये, परीक्षा केंद्रांना कळविण्यात आले असून महाविद्यालयांनी याची तातडीने आपल्या विद्याथ्र्यांना जाणीव करुन द्यावी. तसेच विद्याथ्र्यांनी सुध्दा याची नोंद घ्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता विद्यापीठाच्या वेबसाईटवर परीक्षा विभागाच्या अधिका-यांच्या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button