AmravatiLatest News

अमरावतीला येणाऱ्या एसटी बसला अचानक आग – ७० प्रवासी थोडक्यात बचावले!

अमरावती : चांदूर बाजारहून अमरावती डेपोला येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला सोमवार, २३ जून रोजी दुपारी अचानक आग लागली. बसमध्ये सुमारे ७० प्रवासी होते. ही धक्कादायक घटना कथोरा रोडवरील रंगोली लॉनजवळ घडली.

बसने जेवढं अंतर कापलं होतं, तेवढ्यात दुपारी १.५० वाजता बसमधून अचानक धूर येऊ लागला. क्षणार्धातच बॅटरी वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट होऊन बसने पेट घेतला.

चालक आणि वाहकाचे प्रसंगावधान – ७० प्रवासी सुखरूप वाचले
बसचे चालक दिनेश खोब्रागडे आणि कंडक्टर यांनी प्रसंगावधान राखून बस तातडीने रस्त्याच्या कडेला उभी केली आणि सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. त्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

अग्निशमन दलाचा वेगवान प्रतिसाद – आग नियंत्रणात
घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या कंपाउंड मुख्य केंद्र आणि ट्रान्सपोर्ट नगर उपकेंद्रातील गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.
सय्यद अन्वर, प्रेमानंद सोनकांबळे, मोहसीन इक्बाल, हर्षद दहातोंडे, निखिल बाठे, हाजी खान, ऋषिकेश जाधव, नावेद खान, शोएब खान, खडसे, चव्हाण या पथकाने अथक प्रयत्न करत आग नियंत्रणात आणली.

अंदाजित नुकसान आणि नागरिकांची प्रतिक्रिया
या घटनेत बस पूर्णपणे जळून खाक झाली असून, अंदाजे ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. गाडगे नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व परिस्थिती नियंत्रणात आणली. कोणतीही जीवितहानी न झाल्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button