Amaravti GraminLatest News

अंजनवतीत भीषण अपघात: ट्रकच्या धडकेत शेतमजूर महिलेचा जागीच मृत्यू

धामणगाव रेल्वे : धामणगाव तालुक्यातील अंजनवती गावाजवळील कुऱ्हा रस्त्यावर आज एक हृदयद्रावक अपघात घडला. शेतातून काम करून परत येत असलेल्या एका शेतमजूर महिलेला ट्रकने चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. मृत महिलेचे नाव सिंधू बबन नाचणकर (वय ५२) असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिंधू नाचणकर या सकाळी शेतात कामावर गेल्या होत्या. दुपारी शेतकाम आटोपून त्या परत येत असताना ट्रक क्रमांक AP-39-TZ-0117 ने त्या महिलेला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की महिलेचा मृत्यू घटनास्थळीच झाला.

अपघात घडल्यानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अपघाताची माहिती मिळताच कुऱ्हा पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले व पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

स्थानिक नागरिकांनी अपघातग्रस्त ठिकाणी मोठी गर्दी केली होती. मृत महिलेच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून, स्थानिक प्रशासनाने अपघातातील जबाबदार चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button