Amaravti GraminLatest News

देवरा जिल्हा परिषद शाळेत उन्हाळी शिबिरात उत्साहाचे वातावरण!

अमरावती : देवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेमध्ये शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उन्हाळी शैक्षणिक प्रशिक्षण शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

इंटरनेटच्या युगात विद्यार्थ्यांना विविध माध्यमातून शैक्षणिक धडे दिले जात असून, शासनाच्या अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील मुलांचा सर्वांगीण विकास साधण्यास मदत होत आहे. शाळेतील दुसरी ते चौथी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित या शिबिरात गणित, इंग्रजी, योगा, नृत्य, प्राणायाम यासारख्या शारीरिक व बौद्धिक उपक्रमांसोबतच ‘चंद्रयान-३’वरील माहिती, गावाचा नकाशा तयार करणे, कागद कला असे अनोखे आणि प्रायोगिक प्रकल्पही घेतले जात आहेत.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाविषयी रुची निर्माण होत असून, आगामी शैक्षणिक वर्षासाठी त्यांची पूर्वतयारी सुदृढ होत आहे.
मुख्याध्यापिका कु. प्रतिभा चांदुरकर यांनी सांगितले की, “या अभ्यासक्रम शिबिरामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आणि त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देणे शक्य होते. हे शिबिर काळाची गरज असून, शासनाने अशी उपक्रम सातत्याने राबवावेत.”

विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले गावाचे नकाशे, शैक्षणिक प्रकल्प आणि कलाकृती पाहून पालकांनाही आनंद वाटतो आहे. ग्रामीण भागातील शाळा सुद्धा तंत्रज्ञानाचा वापर करून नवकल्पनांची उंच भरारी घेऊ शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे देवरा येथील हे शिबिर.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button