Amaravti GraminLatest News

उत्तमसरात जल्लोषात साजरा झाला ‘शाळा प्रवेशोत्सव’!

अमरावती : भातकुली पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उत्तमसरा येथे नव्या शैक्षणिक सत्राच्या प्रारंभी प्रवेशोत्सवाचा रंगतदार कार्यक्रम पार पडला. पहिल्यांदाच शाळेचा उंबरठा ओलांडणाऱ्या चिमुकल्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमात नवागत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, शालेय गणवेश, बूट, शॉक्स व लेखन साहित्य वितरित करण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी मसालाभात व लाडूंच्या विशेष भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

  • कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे:
    धर्मेंद्रजी मेहरे – सरपंच व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य (कार्यक्रम अध्यक्ष)
  • रत्नदिप सवाई – अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती
  • सौ. प्रियाताई मानकर – उपाध्यक्ष
  • सचिनभाऊ सवाई – पोलीस पाटील
  • सौ. वनिता जोगी, श्रीमती अनुराधा भिंगारे, जयश्री पेटेकर – अंगणवाडी सेविका
  • श्रीमती मिनाक्षी इंगळे – मुख्याध्यापिका

राजेश सावरकर, गजानन येलोने, प्रमोद कांबळे, श्रद्धा बोबडे – शिक्षक

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर नववर्षाच्या शुभेच्छा देत मान्यवरांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

विशेष आकर्षण: शिक्षक राजेश सावरकर यांचा उपक्रम
शिक्षक राजेश सावरकर यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वखर्चातून सर्व विद्यार्थ्यांना नोटबुक, पेन्सिल आणि स्टेशनरी असलेले पाउच वाटप केले. त्यांच्या या कौतुकास्पद उपक्रमाबद्दल सरपंच धर्मेंद्र मेहरे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करून गौरव केला.

  • कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आयोजन:
    प्रास्ताविक: मुख्याध्यापिका मिनाक्षी इंगळे
  • सूत्रसंचालन: गजानन येलोने
  • आभार प्रदर्शन: राजेश सावरकर

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे शिक्षकवर्ग, पालक दुर्गा-आकाश वानखडे, ममता बोरेकर, सीमा भडके, रुपाली मालधुरे, अर्पणा झाडे, मंदाताई सवाई यांनी विशेष सहकार्य केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button