AmravatiLatest News

शेंगाव -रहाटगांव प्रभागातील अर्जुन नगर डीपी रस्त्याचे आ.सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते भुमीपुजन..

अमरावती : शहराचा वाढता विस्तार व वाढती अवागमन लक्षात घेता रस्ते विकासाला बळकटी मिळणे आवश्यक आहे. शहरातील अंतर्गत भागाला जोडले गेलेले डीपी रस्ते विकसित झाल्यास अपघातविरहित वाहतुकीला चालना मिळणार आहे. दर्जेदार रस्ते निर्मितीतून शास्वत विकासाला अधिक बळकटी मिळणार असल्याचे प्रतिपादन आ.सौ.सुलभाताई खोडके यांनी केले.

प्रभाग क्रमांक १ शेंगाव -रहाटगांव मधील डीपी रस्त्याचे भूमिपूजन आ.सौ.सुलभाताई खोडके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तेलाई मंगल कार्यालय ते अर्जुन नगर ‘ तिरंगा माझा ‘ मैदानाकडे जाणारा रस्त्याचे तसेच ‘ गित अपार्टमेंट ‘ पराग टाउनशिप , तेलाई मंगल कार्यालय ते अर्जुन नगर पर्यंतचा रस्ता या विकास कामाचे भूमिपूजन करून आमदार महोदयांनी रस्ते निर्मिती कार्याचा शुभारंभ केला. यावेळी वेळी स्थानिक सामाजिक कार्यकर्ता प्रशांत ऊर्फ गुड्डू धर्माळे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि, सदर भागात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढत असून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ दिसून येते. त्यामुळे या मार्गावरून वाहतुकीची व रहदारीची चांगली सुविधा व्हावी म्ह्णून डीपी रस्त्याची निर्मिती करण्याची मागणी आमदार महोदयाकडे निवडणूकपूर्व काळातच करण्यात आली. आता निवडून येताच आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करीत आज या विकास कामांचा शुभारंभ केला असल्याचे गुड्डू धर्माळे यांनी सांगितले. सदर भागातील बहूप्रतिक्षीत मागणी निकाली काढल्याबद्दल स्थानिक नागरिकांच्या वतीने आमदार महोदयांचा सत्कार करण्यात आला. विकासाच्या संकल्पनेत गुणवत्तापूर्ण व दर्जेदार रस्त्यांची निर्मिती करणे महत्वाचे आहे. स्थानिक शेंगांव -रहांटगांव भाग दिवसेंदिवस विकसित होत चालला असून त्याभागात चांगल्या पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यास आपले सर्वोतोपरी प्राधान्य आहे.

निवडणूकपूर्व काळात आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून जनतेची संवाद साधला असला अनेक नागरिकांनी या संदर्भात अवगत केले. त्यामुळे लोकांनी आपल्याला निवडून दिले व काम करण्याची संधी दिली त्यांच्यासाठी चांगले काम करणे हे आपले कर्तव्यच आहे. आगामी काळातही प्रभाग क्रमांक १ शेंगाव -रहाटगांव मध्ये पायाभूत सुविधांची कामे, सौंदर्यीकरण , तसेच आरोग्य , क्रीडा व पाणीपुरवठा , वीज पुरवठा आदी विकासात्मक बाबींची पूर्तता करण्यासाठी एक कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही आ.सौ.सुलभाताई खोडके यांनी दिली. दरम्यान स्थानिक नागरिकांच्या निवेदनाचा स्वीकार करीत आमदार महोदयांनी स्थानिकांशी संवाद साधला. यावेळी अर्जुन नगर, गित अपार्टमेंट, पराग टाउनशिप ,हिवसे ले-आऊट ,अनुसया माता मंदिर परिसर, दत्तवाडी, हेगडेवर लेआऊट ,महारुद्र नगर ,अमृत विश्व वसाहत ,पटवारी कॉलनी, आशिष नगर, वर्धेकर लेआऊट, पराग टाऊनशिप, ज्ञानेश्वरी नगर, रहाटगांव गावठाण येथील स्थानिक नागरिक व महिला भगिनी प्रामुख्याने उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button