धारणी व चांदूरबाजार पोलीस ठाण्यांत मोठा बदल: पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

अमरावती: अमरावती जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल झाले असून, प्रशासनिक आदेशानुसार दोन प्रमुख ठाण्यांचे प्रभारी अधिकारी बदलण्यात आले आहेत. यामध्ये धारणी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पीआय अशोक जाधव यांची बदली चांदूरबाजार पोलीस ठाण्याला करण्यात आली असून, त्यांच्या जागी पीआय अवतारसिंह चव्हाण यांची धारणी ठाण्याचे नवीन प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
PI अशोक जाधव हे धारणीमधील त्यांच्या कडक, निष्पक्ष आणि प्रभावी कार्यशैलीसाठी ओळखले जात होते. आदिवासी भागातील गुन्हेगारी नियंत्रण, अंमली पदार्थ विरोधी मोहिमा व कायदा-सुव्यवस्थेवर त्यांनी ठाम पकड ठेवली होती. आता ते चांदूरबाजारसारख्या गुन्हेगारी संवेदनशील ठिकाणी नव्याने जबाबदारी पार पाडणार आहेत.
दुसरीकडे, PI अवतारसिंह चव्हाण हे देखील अत्यंत अनुभवी, शिस्तप्रिय व क्रियाशील अधिकारी म्हणून परिचित आहेत. त्यांच्या नेतृत्वात मेलघाटच्या जंगल भागात असलेल्या धारणीतील कायदा व सुव्यवस्थेला अधिक बळकटी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
एकच आदेश, दोन भाग्यविधाते
या बदलांमुळे दोन्ही ठाण्यांमध्ये नवा उत्साह, नवी कार्यशैली आणि गुन्हेगारीवर अधिक आक्रमक कारवाई होणार अशी चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.
आता गुन्हेगारांनी सावध राहणं गरजेचं आहे — कारण दोन्ही ठिकाणी कमान असली “सिंहां”च्या हातात आली आहे!



