BuldhanaLatest News

जुन्या वादातून लोखंडी पाईपने मारहाण; युवकाचा मृत्यू, तिघेजण पोलिसांच्या ताब्यात

बुलढाणा : दोन परिवारांमध्ये जुना वाद होता. या जुन्या वादावरून चार जणांनी मिळून युवकाला लोखंडी पाइपने बेदम मारहाण केली. मारहाणीत युवक गंभीर जखमी झाला होता. दरम्यान उपचारासाठी दाखल केले असताना उपचारादरम्यान या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शेगाव तालुक्यातील जलंब या गावात घडली आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली असून पोलिसांकडून तपास सुरु आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुकयातील जलंब येथील राहणार योगेश मोहे असे घटनेत मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. योगेश मोहे याचे गावातच राहणाऱ्या एका परिवारासाठी वाद होते. या वादातून वासुदेव धोंडुजी मोहे, गजानन धोंडुजी मोहे, शालिग्राम धोंडुजी मोहे, विशाल शालिग्राम मोहे यांनी योगेश यास घरासमोर येऊन लोखंडी पाइपने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले होते. मारहाणीमध्ये योगेश हा गंभीर जखमी झाला होता.

उपचारादरम्यान मृत्यू जखमी योगेश यास गावातील काही नागरिकांनी उपचारासाठी प्रथम अकोला येथे दाखल केले होते. यानंतर नागपूर येथे भरती करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. यावेळी कुटुंबाने एकच आक्रोश केला. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून जलंब पोलिसांनी मारहाण करणाऱ्या चार आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहित्याच्या विविध कलम नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

तिघेजण ताब्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घटनेतील तिघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, या प्रकरणातील एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरु आहे. तर घटनेचा तपास ठाणेदार अमोल सांगळे यांच्या मार्गदर्शनात नन्हेखा तडवी, बोदडे करीत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button