AkolaLatest News

अकोल्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रशांत जावरकर यांनी विषारी इंजेक्शन घेऊन जीवन संपवल्याची खळबळजनक घटना

अकोला : अकोला शहरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. सन्मित्र हॉस्पिटलमध्ये मानसोपचारतज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेले डॉ. प्रशांत जावरकर यांनी विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने वैद्यकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, डॉ. जावरकर यांनी न्यू तापडिया नगरमधील त्यांच्या राहत्या घरी विषारी इंजेक्शन घेत आत्महत्या केली. ही घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली असून, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

डॉ. प्रशांत जावरकर हे गेल्या अनेक वर्षांपासून मानसिक तणावाने ग्रस्त रुग्णांचे समुपदेशन करत होते. ते प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. दीपक केळकर यांच्या सन्मित्र हॉस्पिटलमध्ये कार्यरत होते. समुपदेशन करणाऱ्या डॉक्टरनेच आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला असून पुढील तपास सुरू आहे.

या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली असून, डॉक्टर, नातेवाईक आणि रुग्ण यांच्या मनात मोठा धक्का बसला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button