AmravatiLatest NewsLocal News

शहरी आरोग्य केंद्रांतर्गत गांधी आश्रम, आनंद नगर, महाजनपुरा, माताखिडकी परिसरात विशेष कुष्ठरोग सर्वेक्षण मोहीम

अमरावती : शहरी आरोग्य केंद्र, भाजीबाजार अंतर्गत येणाऱ्या गांधी आश्रम, आनंद नगर, महाजनपुरा, माताखिडकी या परिसरात १८ व १९ जून २०२५ रोजी दोन दिवसीय विशेष कुष्ठरोग सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेंतर्गत नागरिकांची शारीरिक तपासणी करण्यात आली तसेच कुष्ठरोगासंदर्भात आवश्यक माहिती देण्यात आली. मोहिमेचा उद्देश नागरिकांमध्ये जनजागृती करून संभाव्य रुग्णांचे लवकर निदान आणि उपचार सुनिश्चित करणे हा होता.

या मोहिमेत शहरी आरोग्य केंद्र, भाजीबाजार येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋतुजा सुरंजे (LMO), कुष्ठरोग विभागाच्या डॉ. विनंती नवरे, तसेच आरोग्य वर्धिनी आनंद नगर येथील डॉ. शिवानी शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

संपूर्ण मोहिमेत शहरी आरोग्य केंद्र, भाजीबाजार येथील आशा वर्कर, ANM आणि MPW यांनी सहभाग घेतला. नागरिकांशी प्रत्यक्ष संपर्क साधून तपासणी केली गेली आणि रोगविषयक माहिती दिली गेली.

सर्वेक्षणात सहभाग घेतलेले अधिकारी व कर्मचारीश्रीमती उमा संजय जाधव (PHN)

श्री पन्हाळे सर (अवैप अम.)

श्रीमती लिना वानखडे (ANM)

श्री शशिकांत जयस्वाल (MPW)

कुष्ठरोग विभागातील श्रीमती गावंडे, श्रीमती केने, श्रीमती रामटेके, श्री इंगळे, श्री पिटर, श्री सोनार, श्री धुडे व इतर कर्मचारी

या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांमध्ये कुष्ठरोगाबाबत जागरुकता वाढली असून, भविष्यातील उपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये मदत होणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button