AmravatiLatest News

विद्यापीठात 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

अमरावती : सर्वांनी आपलं आरोग्य सुदृढ राहण्याकरिता नियमित योग, प्राणायाम करायला हवा. आरोग्याची ती खरी गुरूकिल्ली आहे. स्वत:बरोबर सामाजिक स्वास्थ्य सुदृढ राहण्यासाठी योग आणि प्राणायामचा प्रचार व प्रसार करावा, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागांतर्गत एम.ए. योगशास्त्र, पी.जी. डिप्लोमा योगा थेरपी व पी.जी. डिप्लोमा नॅचरोपॅथी अॅन्ड योगिक सायन्स व्दारा 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस विद्यापीठात मोठ¬ा उत्साहात साजरा करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रवींद्र कडू, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. अजय लाड, आजीवन अध्ययन विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील, आंतरराष्ट्रीय योग चिकित्सक, पुणे येथील योग प्रशिक्षक डॉ. सुप्रिया चकोले उपस्थित होते.
विद्यापीठ परिसरामध्ये आंतरराष्ट्रीय योग चिकित्सक, पुणे येथील योग प्रशिक्षक डॉ. सुप्रिया चकोले यांच्या मार्गदर्शनाखाली व स्वास्थ्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, अमरावती येथील योग तज्ज्ञ व वैद्यकीय व्याख्याता डॉ. संगीता सौंदळे यांनी उपस्थितांकडून योगाभ्यास व प्राणायाम करुन घेतला. विविध प्रकारच्या योगाभ्यासाचा शरीराच्या विविधांगी भागाला कसा उपयोग होतो, याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. कुलगुरू पुढे म्हणाले, आजीवन अध्ययन विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील यांनी अतिशय चांगला उपक्रम योगशास्त्र अभ्यासक्रमाच्यावतीने आयोजित केला, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी नवनवीत संकल्पना राबवित विविध अभ्यासक्रम सुरू केलेत. यावर्षीच्या योग दिनाकरिता ‘वन अर्थ, वन हेल्थ’ ही थीम आहे. मानवीय आरोग्य खूप महत्वाचे आहे. पैशाच्या मागे न लागता आरोग्याकडे लक्ष देणे अधिक महत्वाचे असून तीच खरी संपत्ती असल्याचे कुलगुरू म्हणाले.
भारतीय योगाभ्यास अधिक उपयुक्त – डॉ. रवींद्र कडू
योगाभ्यासातून शरीरशुध्दी होते, त्यापाठोपाठ व्याधी सुध्दा दूर होतात. अनेक सूत्र पतंजलीने दिले आहेत. योग दिवसाला उन्हाळी संक्रांत दिवस मानतात. पाश्चिमात्य व्यायाम व योगा यात फरक आहे. भारतीय योगाभ्यासामध्ये दिलेल्या मूळ स्थितीत प्रत्येकाने आसन करणे गरजेचे असून त्यातून आपल्याला चांगले आरोग्य नक्कीच मिळेल, असेही ते म्हणाले.
विद्यापीठ आरोग्य केंद्राच्यावतीने आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेनुसार नेत्रदानाचे अर्ज भरुन देण्याचे आवाहन याप्रसंगी कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. श्रीकांत पाटील, सूत्रसंचालन डॉ.अनघा देशमुख यांनी, तर आभार डॉ. अ·िानी राऊत यांनी मानले. योग दिन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रा. स्वप्निल इखार, प्रा. आदित्य पुंड, डॉ. अ·िानी राऊत, प्रा. राधिका खडके, प्रा. राहुल दोडके, प्रा. प्रफुल्ल गांजरे, डॉ. अनघा देशमुख यांनी परिश्रम घेतले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button