AkolaLatest News

अकोल्यात बोगस डॉक्टरवर मनपा वैद्यकीय अधिकारी व अन्न प्रशासन विभागाने कारवाई

अकोला : हरिहर पेठ, जुने शहर भागात बोगस डॉक्टरकडून सुरू असलेल्या विनापरवाना वैद्यकीय व्यवसायावर अखेर कारवाई करण्यात आली आहे. महापालिका आरोग्य विभाग व अन्न व औषध प्रशासनाने संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत डॉ. जावेद शेख या बोगस डॉक्टरवर धाड टाकण्यात आली.

शहरातील जुने शहर पोलीस ठाणे व महापालिकेच्या आरोग्य पथकाने केलेल्या तपासणीत, संबंधित डॉक्टरकडे कोणतीही वैद्यकीय शैक्षणिक पात्रता नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच संबंधित हॉस्पिटलमध्ये रुग्णांची नोंद न करता थेट उपचार सुरू होते, हे देखील आढळून आले.

महत्त्वाचे म्हणजे, सदर हॉस्पिटलला मुंबई नर्सिंग होम अ‍ॅक्ट १९४९ अंतर्गत कोणतीही वैध मान्यता नसल्याचे उघडकीस आले. तपासणीदरम्यान आठ रुग्णांवर उपचार सुरू होते. काही रुग्णांना सलाईन लावण्यात आले होते, तर औषधांचा साठा देखील आढळला.

औषध निरीक्षक माणिकराव व गोतमारे यांना पुढील चौकशीसाठी पाचारण करण्यात आले. प्राथमिक चौकशीनंतर बेकायदेशीर रुग्णालय चालवण्याचा ठपका ठेवत, जुने शहर पोलीस ठाण्यात डॉ. जावेद शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • काय आढळलं तपासणीत?
  • डॉक्टरकडे कोणतीही वैद्यकीय पात्रता नव्हती
  • रुग्णांची नोंदणी न करता सुरू होते उपचार
  • मुंबई नर्सिंग होम अ‍ॅक्ट अंतर्गत मान्यता नव्हती
  • हॉस्पिटलमध्ये औषध साठा आणि रुग्णांवर उपचार सुरू

प्रतिनिधी – मुकेश ढोके

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button