Latest NewsNanded

“नांदेडच्या वडगावात घरफोडी: दीड लाखांचा ऐवज लंपास, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण”

नांदेड : नांदेड तामसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होताना दिसत आहे. नुकतीच वडगाव येथे एक धक्कादायक चोरीची घटना समोर आली आहे. या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.

वडगाव येथील हॉटेल व्यवसायिक सोमनाथ नारेवाड यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला. नारेवाड हे कामानिमित्त बाहेरगावी गेले असतानाच चोरट्याने ही संधी साधली. घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख ५० हजार रुपये असा एकूण सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला आहे.

घटनेची माहिती मिळताच तामसा पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून चोरीप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून चोरट्यांचा शोध सुरू आहे.

स्थानिक प्रतिक्रिया:
घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. “गावात दिवसाढवळ्या चोऱ्या होत असल्याने आमचा सुरक्षिततेवरचा विश्वासच उडाला आहे,” अशी प्रतिक्रिया एका स्थानिक नागरिकाने दिली.

प्रतिनिधी – मनोज मनपुर्वे

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button