AkolaLatest News

अकोला: लाच मागितल्याच्या आरोपाखाली पातूरचे नायब तहसीलदार अटकेत!

अकोला : पातूर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार बळीराम चव्हाण यांना ४ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अटक केली आहे. अकोला एसीबी पथकाने सापळा रचून ही कारवाई केली असून, सरकारी कामासाठी लाच मागितल्याचा आरोप आहे.

अकोला: लाच मागितल्याच्या आरोपाखाली पातूरचे नायब तहसीलदार अटकेत!संबंधित प्रकरणात नायब तहसीलदार चव्हाण यांनी एका नागरिकाकडे ४ हजार रुपयांची लाच मागितली होती. सरकारी दस्तऐवज व प्रक्रिया करण्याच्या बदल्यात ही मागणी करण्यात आली. मात्र, तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली.

ACBची पडताळणी आणि सापळा
तक्रारीनंतर, एसीबीच्या पथकाने पंचांसमक्ष पडताळणी केली आणि नायब तहसीलदार चव्हाण यांनी प्रत्यक्षात लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर लगेचच सापळा रचून चव्हाण यांना अटक करण्यात आली.

गुन्हा दाखल
या प्रकरणी चव्हाण यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एसीबी अकोला करत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button