नागपूरच्या यशोधरा नगर पोलीस ठाण्याची यशस्वी कारवाई: चार घरफोडी गुन्हे उघड, सुमारे 5.68 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

4 मे 2025 च्या मध्यरात्री 11:45 वाजल्यापासून 5 मेच्या सकाळी 8:30 पर्यंत, कुंदनलाल गुप्ता नगर, शाहू मोहल्ला येथे राहणाऱ्या 52 वर्षीय किशोर मारुती निमजे यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली होती.”
“या प्रकरणी यशोधरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 351/2025 नोंदवण्यात आला होता. तपासादरम्यान, पोलीस पेट्रोलिंगदरम्यान गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, राहुल राजू हाटेवार या संशयिताला ताब्यात घेण्यात आले.”
“सखोल चौकशीत राहुल हाटेवारने गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याने आपल्या साथीदारांसोबत मिळून चार गुन्ह्यांत सहभाग असल्याचे सांगितले. त्यानंतर दुसरा आरोपी निकेश बलराज शहा यालाही अटक करण्यात आली.”
“या चौकशीतून यशोधरा नगर पोलिसांनी एकूण ₹9 लाख 2 हजार 750 रुपयांचा चोरी गेलेला मुद्देमाल शोधून काढला, त्यापैकी ₹5 लाख 68 हजार 750 रुपयांचा मौल्यवान माल जप्त करण्यात आला आहे.”
“ही कारवाई मा. पोलीस उपआयुक्त निकेतन कदम, सहायक पोलीस आयुक्त बंडीवार साहेब, आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश खुने, गुन्हे निरीक्षक सुहास राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपासात सहभागी असलेले पोलीस कर्मचारी वैभव नागे, राहुल बोंदरे, किशोर देवांगन, संदीप वानखेडे, मनीष झरकर, शितेस चौरसिया, सन्नी मतेल आणि प्रवीण बावनकर यांचे विशेष योगदान लाभले.”
“यशोधरानगर पोलिसांच्या या तडाखेबंद कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीला जबरदस्त चाप बसला असून, नागपूर पोलिसांचे हे यश निश्चितच उल्लेखनीय आहे.”



