Amaravti GraminLatest News

अमरावती–परतवाडा मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य: निष्पाप युवकाचा बळी, संतप्त नागरिकांचा संताप

अमरावती : अमरावती–परतवाडा या मुख्य मार्गावर वलगाव ते पूर्णा नगर दरम्यानचा संपूर्ण रस्ता अक्षरशः खड्डेमय झाला आहे. यामुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात आला असून, मार्की फाट्याजवळ काल एका युवकाचा अपघातात मृत्यू झाल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

खड्ड्यांतून मृत्यूला निमंत्रण!
स्थानिक नागरिकांनी यापूर्वी अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (PWD) निवेदने सादर केली होती. मात्र याकडे दुर्लक्ष करत विभागाने केवळ अपघात घडल्यावरच जाग येते, असा थेट आरोप करण्यात येत आहे.

अपघातानंतर खड्डे बुजवण्याची तातडीची धावपळ
अपघातानंतर विभागाने खड्डे बुजवण्यासाठी तात्काळ टीम पाठवून कामाला सुरुवात केली आहे. मात्र नागरिकांचा प्रश्न स्पष्ट आहे:

“जर हे खड्डे आधी बुजवले असते, तर हा निष्पाप जीव वाचला असता!”

अमरावती सब डिव्हिजनची कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
नागरिकांच्या मते, अचलपूर सब डिव्हिजनमध्ये दर्जेदार रस्त्याचे काम होत असताना, अमरावती सब डिव्हिजनमध्ये मात्र “थातूरमातूर” काम केले जात आहे.
हे विभागीय भेदभावाचे लक्षण की दुर्लक्षाचे? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

पावसाळा आणि चिखलदऱ्याची पर्यटकांची गर्दी
विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदऱ्यात पावसाळ्यात पर्यटकांची वर्दळ वाढते, त्यामुळे या मार्गावर वाहतूकही अधिक होते. यामुळे रस्त्यांची अवस्था अत्यंत धोकादायक बनते.

  • नागरिकांची ठाम मागणी:
    खड्डे बुजवण्याचे काम तातडीने पूर्ण करावे
  • संपूर्ण मार्गाचे दर्जेदार डांबरीकरण करावे
  • PWD विभागाने नियमित देखरेख ठेवावी
  • अपघातग्रस्त कुटुंबियांना मदत द्यावी

प्रतिनिधी :-गजानन खोपे

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button