AkolaLatest News

अकोल्यात जुने शहर पोलिसांची मोठी कारवाई: दुचाकी चोर गजाआड, दोन चोरीच्या मोटरसायकली जप्त

अकोला : जुने शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केलेल्या प्रभावी तपासामुळे दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश करत हिंगणा म्हैसपूर येथील एका इसमास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मोरगाव साजन येथील 52 वर्षीय संजय ज्ञानदेव टेकाडे यांनी अकोल्याच्या जुने शहर पोलीस ठाण्यात त्यांच्या दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी पोलीस स्टेशन जुने शहर अकोला येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

तपासाची चक्रे फिरवत जुने शहर पोलिसांनी हिंगणा म्हैसपूर येथील 36 वर्षीय योगेश रामेश्वर पेसोडे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून हीरो होंडा स्प्लेंडर कंपनीची एक मोटरसायकल आणि बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी गेलेली दुसरी दुचाकी असा एकूण दोन दुचाकींचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

या कारवाईमुळे एकाचवेळी अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला असून परिसरातील नागरिकांमध्ये पोलीस दलाच्या या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.

या संपूर्ण तपास मोहिमेचे नेतृत्व पोलीस निरीक्षक नितीन लेव्हलकर यांच्या मार्गदर्शनाखाली जुने शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button