Amaravti GraminLatest News

“बडनेरामध्ये मोफत आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; रक्त व दंत तपासणीसह अनेक चाचण्या मोफत”

बडनेरा : बडनेरा नवी वस्ती येथील गणेश नगर झीरी मंदिराजवळ श्री सिद्धिविनायक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मोफत रक्त व दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला परिसरातील शेकडो नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.

श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर, यवतमाळ रोड येथे आयोजित या शिबिराचे आयोजन ट्रस्ट व परिसरातील नागरिकांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. आरोग्य तपासणीसाठी विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटी द्वारा संचालित दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या आरोग्य पथकाने विशेष सहकार्य केले.

  • शिबिरात खालील तपासण्या मोफत करण्यात आल्या:
  • रक्त तपासणी
  • दंत तपासणी
  • लिव्हर प्रोफाइल
  • किडनी प्रोफाइल
  • लिपिड प्रोफाइल
  • थायरॉईड प्रोफाइल
  • कॅन्सर मार्कर (SBA, HC)
  • व्हिटॅमिन D आणि B12

या उपक्रमात सहभागी होणाऱ्यांनी शिबिराचे विशेष कौतुक केले असून, नियमित स्वरूपात अशा शिबिरांचे आयोजन व्हावे अशी मागणी उपस्थित नागरिकांनी केली.

कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये सिद्धिविनायक चॅरिटेबल ट्रस्ट व परिसरातील विविध प्रतिष्ठित नागरिकांचे विशेष योगदान लाभले. यामध्ये तृप्ती वाठे यांनी या उपक्रमाची माहिती देत सामाजिक उत्तरदायित्वाची भूमिका अधोरेखित केली.

या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून ‘आरोग्य हीच खरी संपत्ती’ या विचाराचे प्रत्यक्ष उदाहरण साकार झाले आ

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button