संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात स्व. डॉ. श्रीकांत जिचकार पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न

अमरावती : देशातील सर्वाधिक शिक्षण घेतलेले व्यक्तिमत्व, माजी मंत्री आणि विचारवंत स्व. डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या पुण्यतिथीनिमित्त संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. श्रीकांत जिचकार स्मृति संशोधन केंद्रात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
विद्यापीठाच्यावतीने आदरांजली अर्पण
कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी डॉ. जिचकार यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करत विद्यापीठाच्यावतीने श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक, सामाजिक व राजकीय कार्याचे स्मरण करून उपस्थितांनी अभिवादन केले.
अनेक विभाग प्रमुखांची उपस्थिती
या कार्यक्रमाला आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील, IQAC संचालक डॉ. संदीप वाघुळे, संशोधन केंद्राचे संचालक डॉ. संदीप जोशी, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर, उपअभियंता (विद्युत) श्री राजेश एडले, IIMC संचालक डॉ. राजेश कुशवाह, डॉ. विनय सोनुले तसेच विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी आणि महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. जिचकार – एक बहुआयामी व्यक्तिमत्व
स्व. डॉ. श्रीकांत जिचकार हे देशातील सर्वाधिक पदव्या मिळवलेले शिक्षित व्यक्तिमत्व होते. त्यांनी एकूण 42 पदव्या मिळवल्या असून, डॉक्टर, वकील, प्रशासक, साहित्यिक आणि राजकारणी अशा विविध क्षेत्रांत त्यांनी आपला ठसा उमठवला होता. विदर्भ आणि महाराष्ट्राच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांनी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे.



