Latest NewsNanded

मंत्री झिरवळानी ताफा थांबवत नांदेडच्या इस्लापूर येथे एका साध्या कटिंगच्या दुकानात केली दाडी

नांदेड : इस्लापू राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ हे आज नांदेड दौऱ्यावर असताना त्यांच्या साधेपणाचे आणखी एक उदाहरण सर्वसामान्य नागरिकांच्या डोळ्यांसमोर आलं. झिरवळांनी इस्लापूर गावातील एका अगदी सामान्य कटिंगच्या दुकानात थेट दाढी करून ग्रामस्थांना आश्चर्याचा धक्का दिला.

सामान्य कटिंग शॉप, असामान्य मंत्री!
किनवट तालुक्यातील शेतकरी मेळावा आणि लग्न समारंभ यासाठी मंत्री झिरवळ नांदेडच्या दौऱ्यावर होते. वाटेत इस्लापूर गावात अचानक त्यांनी ताफा थांबवला. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका सामान्य कटिंगच्या दुकानाकडे ते वळाले आणि अगदी निवांतपणे दाढी करण्यासाठी खुर्चीवर बसले!

गावकऱ्यांची गर्दी, मोबाईल कॅमेरे आणि आनंदाचा क्षण!
झिरवळांचा साधेपणा पाहून गावकऱ्यांनी उत्साहाने त्यांचं स्वागत केलं. अनेकांनी हा अनोखा क्षण आपल्या मोबाईलमध्ये टिपला. मंत्रीसाहेबांच्या या कृतीमुळे जनतेत आपुलकीचं वातावरण निर्माण झालं.

“मंत्री असूनही असा साधेपणा दुर्मिळ” – ग्रामस्थांचा अभिप्राय
इस्लापूर येथील ग्रामस्थांनी सांगितलं की, “इतकं मोठं पद असूनही झिरवळ साहेब सामान्य माणसासारखे वागतायत, हे आमच्यासाठी अभिमानाचं आहे. असा साधेपणा राजकारण्यांमध्ये फार कमी दिसतो.”

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button