AmravatiLatest News

अमरावतीचे नवे पोलीस आयुक्त अरविंद चावरीया यांचे सिटी न्यूजचे प्रबंध संपादक यांनी केले स्वागत

अमरावती : अमरावती शहराचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अरविंद चावरीया यांनी नुकताच आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे. या निमित्ताने मंगळवारी, 27 मे रोजी सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉ. चंदू सोजतीया आणि उपसंपादक प्रदीप सोजतीया यांनी पोलीस आयुक्तालयात भेट देत आयुक्त अरविंद चावरीया यांचे औपचारिक स्वागत केले.

या भेटीत सन्मानचिन्ह म्हणून चावरीया यांना रोपट्याचे भेंट देण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत दिल्या गेलेल्या या रोपट्याबरोबरच डॉ. चंदू सोजतीया लिखित “श्रीलाल शुक्ल के उपन्यासों में सामाजिक राजनीतिक चेतना” हे सामाजिक आणि राजकीय विषयांवर आधारित अभ्यासपूर्ण पुस्तक देखील भेट देण्यात आले.

या प्रसंगी डॉ. सोजतीया यांनी आयुक्त चावरीया यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आणि अमरावती शहराच्या सुरक्षेसाठी यशस्वी कार्यवाहीच्या अपेक्षा व्यक्त केल्या.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button