Latest NewsYavatmal
पुसद येथे भीषण अपघात! मालवाहू ट्रकवर कोसळली कमान
पुसद – पुसद शहरातील पुसद-वाशिम मार्गावर असलेल्या जागृत श्री धनकेश्वर महादेव मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील कमानीला मालवाहू ट्रकने जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात घडला. धडकेमुळे कमान थेट ट्रकच्या केबिनवर कोसळली, आणि ट्रकचा चालक काही वेळ त्यात अडकून पडला.
मदत आणि बचावकार्य:
घटनास्थळी नागरिकांनी तत्काळ धाव घेतली आणि प्रशासनाच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन राबवून चालकाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. चालक जखमी असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले.
अपघातात…
जीवितहानी झाली नाही.
मात्र ट्रक आणि कमानीचे मोठे नुकसान झाले आहे.
कमान जवळपास पूर्णतः कोसळली आहे
प्रशासनाकडून पुढील कारवाई सुरू असून, कमान उंचीच्या मर्यादेबाबत व रस्त्यावरील सुरक्षेच्या उपाययोजनांकडे आता लक्ष देण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.



