AmravatiamravatinewsLatest News

आयकर अधिकाऱ्यांच्या नो-पार्किंगमधील गाड्यांवर चालान; रीता उईके यांची कारवाई चर्चेत

अमरावती : अमरावती शहरात गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या आयकर विभागाच्या कारवायांमध्ये जयस्तंभ चौकातील ‘एकता आभूषण शोरूम’वर ९६ तासांचा तपास सुरू होता. या तपासासाठी नागपूरसह इतर भागातून आलेले आयकर अधिकारी खाजगी इनोव्हा वाहनांचा वापर करत होते.

पण या इनोव्हा गाड्यांनी जयस्तंभ चौकातील ‘नो पार्किंग’ झोनमध्ये थेट गाड्या उभ्या केल्या, ज्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. यावेळी वाहतूक पोलीस निरीक्षक रीता उईके त्या परिसरात अनधिकृत पार्किंगविरोधात कारवाई करत होत्या. त्यांच्या नजरेस ही नियमभंग करणारी वाहनं पडताच त्यांनी थेट चालानाची प्रक्रिया सुरू केली.

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही वाहने आपली असल्याचं सांगून कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केला आणि दबाव आणण्याचाही प्रयत्न केला. पण रीता उईके यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता “नियम सर्वांसाठी सारखे” हे ठणकावून सांगितलं आणि तीन ते चार इनोव्हा गाड्यांना थेट चालान फाडलं.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button