Latest NewsPune

१२ वी चा निकाल उद्या (५ मे ) रोजी होणार जाहीर, महाराष्ट्र राज्य शिक्षणमंडळाने केली घोषणा

पुणे : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC/12th) परीक्षेचा निकाल उद्या, सोमवारी 5 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) यासंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.

निकाल राज्य शिक्षण मंडळाच्या पत्रकार परिषदेद्वारे जाहीर केला जाईल. त्यानंतर विद्यार्थी अधिकृत संकेतस्थळांवर आपला निकाल पाहू शकतील व गुणपत्रिकेची प्रत डाऊनलोड करू शकतील.

निकाल तपासण्याची प्रक्रिया:
महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जा – mahresult.nic.in

HSC Result 2025 लिंकवर क्लिक करा.

आपला Seat Number/Exam Roll Number आणि इतर आवश्यक माहिती भरा.

Submit करा.

निकाल स्क्रीनवर दिसेल – सेव्ह करा व प्रिंट घ्या.

निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळांची यादी:
https://mahresult.nic.in

https://mahahsscboard.in

http://hscresult.mkcl.org

https://results.digilocker.gov.in

https://results.targetpublications.org

https://results.navneet.com

  • परीक्षा कधी झाली?
    बारावी (HSC) परीक्षा: 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025
  • दहावी (SSC) परीक्षा: 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025

दोन्ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने पार पडल्या आणि राज्यभरातून विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला.

  • विद्यार्थ्यांसाठी सूचना:
  • निकाल जाहीर होताच वेबसाईटवर तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता आहे, त्यामुळे संयम ठेवावा.

निकालाची प्रिंटआऊट तात्पुरती असते, मूळ गुणपत्रिका संबंधित शाळांमधून मिळेल.

निकालात तांत्रिक किंवा माहितीशी संबंधित चूक आढळल्यास तात्काळ शाळेशी संपर्क साधावा.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button