Crime NewsLatest NewsNagpur

नागपूर रेल्वे स्टेशनवर चोरीस गेलेला 86 हजार रुपयांचा मुद्देमाल बारा तासात हस्तगत, आरोपी पकडला

नागपूर :- नागपूर रेल्वे स्टेशनवर एका महिला प्रवाशाची महत्त्वपूर्ण वस्त्र चोरी झाल्याची घटना घडली. मात्र, लोहमार्ग पोलिसांच्या तत्परतेमुळे आरोपीला पकडून चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल बारा तासांच्या आत हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.

18 मार्च रोजी रात्री एक वाजता, महिला वर्धा जाण्याकरिता नागपूर रेल्वे स्टेशनवर येऊन प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर थांबल्या होत्या. झोपेत असताना अज्ञात आरोपीने त्यांचा लॅपटॉप, स्मार्ट वॉच आणि इतर महत्त्वाचे कागदपत्रांसह 86 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला. लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीची ओळख पटवली आणि अवघ्या बारा तासात त्याला पकडून चोरीला गेलेला माल हस्तगत केला.

सदर घटनेतील आरोपीला नागपूर रेल्वे पोलिसांनी पकडले असून या प्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे. पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रियंका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी हे यश संपादन केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button