दहावी-बारावी निकाल 2025 15 मे पूर्वी जाहीर होणार ?

विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी मोठी अपडेट! दहावी-बारावीच्या निकालाची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. राज्यातील बारावीच्या परीक्षा संपल्या असून दहावीच्या अजून दोन पेपर बाकी आहेत. विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे निकालाविषयीचे उत्सुकता वाढली आहे. मात्र, यंदा निकाल वेळेत लागणार आहे. शिक्षण मंडळाच्या माहितीनुसार, दहावी-बारावी परीक्षांचे निकाल 15 मेपूर्वीच जाहीर होण्याची शक्यता आहे.
उत्तरपत्रिकांची तपासणी जलद गतीने सुरू आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण विभागांमध्ये शिक्षकांकडून दररोज उत्तरपत्रिकांच्या तपासणीचा आढावा घेतला जात आहे.
यंदा शिक्षक संघटनांचा बहिष्कार नाही, त्यामुळे निकाल लवकर जाहीर होईल. मात्र, उत्तरपत्रिकांच्या सुरक्षेसाठी बोर्डाने नवे कठोर नियम लागू केले आहेत. विरारमध्ये एका शिक्षिकेच्या घरी उत्तरपत्रिका जळाल्याच्या घटनेनंतर, शाळेच्या वेळेतच उत्तरपत्रिका तपासण्याचे आदेश दिले आहेत.
“दहावी-बारावीच्या निकालाची प्रतिक्षा आता काही आठवड्यांत संपेल. 15 मेपूर्वी निकाल लागण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी निर्धास्त राहावे.



