कौंडण्यपूर बॅरेजचे लाभक्षेत्र नदीजोड प्रकल्पात सामिल होणार

अमरावती, कौंडण्यपूर :- सन 2011 पासुन कौंडण्यपूर बॅरेजचा प्रश्न प्रलंबित असल्याने हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजपाच्या प्रदेश कार्यकारीणी सदस्य निवेदिता चौधरी यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनखुळे व जलसंपदामंत्री गिरिष महाजन यांची भेट घेतली आहे.
वर्धा खोऱ्यामध्ये पाण्याची उपलब्धता नसल्याने कौंडण्यपूर बॅरेजचा प्रकल्प अहवाल 2011 पासुन शासन दरबारी प्रलंबित आहे. परंतु वर्धा खोऱ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आता वैनगंगा पैनगंगा नदीजोड प्रकल्पाअंतर्गत पाणी सोडण्यात येणार असल्याने या खोऱ्यामध्ये पाण्याची उपलब्धता झाल्यावर पाणी कौडण्यपूर बॅरेजमध्ये सोडणे शक्य होणार आहे.कौडण्यपूर बॅरेजच्या लाभक्षेत्रातुन वऱ्हा,धोत्रा,मालधूर,माळेगाव,सालोरा,मार्डी यासह अनेक शिवारातील सिंचन क्षेत्रात वाढ होवून शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. वैणगंगा पैनगंगा नदीजोड प्रकल्प पुर्ण व्हावा यासाठी निवेदिता चौधरी यांनी सतत 10 वर्ष पाठपुरावा केला होता. कौंडण्यपूर बॅरेजचा प्रकल्प अहवाल तयार असुन तांत्रिक व प्रशासकीय मान्यता झाल्याबरोबर प्रकल्पाचे काम सुरु होण्यास मदत होणार आहे.
कौंडण्यपूर बॅरेज प्रकल्प मार्गी लावण्यासाठी लवकरच बैठक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या निदर्शनास कौंडण्यपूर बॅरेजचा विषय आणुन दिला आहे याबाबत ते सकारात्मक आहे.अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व जलसंपदामंत्री गिरिष महाजन यांच्याकडे याबाबत मागणी केली असुन पालकमंत्री बावनकुळे यांनी याबाबत विदर्भ सिंचन महामंळाच्या मुख्यालयात बैठक आयोजित करण्याबाबत अधिकऱ्यांना सुचना दिलेल्या आहे अशी माहिती निवेदिता चौधरी यांनी दिली आहे.हा प्रकल्प मंजूर झाल्यावर हजारो हेक्टर जमिन सिंचनाखाली येणार असुन शेतकऱ्यांना आत्हत्येच्या दुष्टचक्रातुन बाहेर काढण्यास मदत होणार आहे.



