AmravatiLatest News
महानगरपालिका अतिक्रमण विभाग व पोलीस विभागा समवेत संयुक्तपणे अतिक्रमण काढण्याची कार्यवाही
मा.आयुक्त व उपायुक्त प्रशासन,यांच्या आदेशान्वये गुरुवार दिनांक ०९/०१/२०२५ रोजी गाडगे नगर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनामध्ये कोर्ट परिसर समोरील फुटपाथ व जिल्हा परिषद परिसरचे फुटपाथ वरील असलेले अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करण्यात आली. सदर कार्यवाही मध्ये अतिक्रमण पथक प्रमुख श्री.योगेश कोल्हे, निरीक्षक अन्सार अहमद, संदीप सोनोने, शुभम पांडे,व पोलीस मुख्यालयाचे पोलीस कर्मचारी व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यवाही मध्ये दोन ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.



