AmravatiLatest News
सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आराध्या फाउंडेशन वतीने कर्तृत्वान महिलांचा जंगी सत्कार
३ जानेवारी सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून छत्रसाल नगरातील आराध्या फाऊंडेशन चे अध्यक्ष नितीन काळे आणि मित्रमंडळ वतीने शहरातील कर्तृत्वान महिलांचा स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्याना महिलांचा सन्मान करण्यात आला, सोबतच शहरातील भजन महिला मंडळाचा शाल मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आला. शहरातील छत्रसाल नगरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्यक्रमाचे आयोजन करणारे आराध्या फाऊंडेशन वतीने पुन्हा सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून शहरातील अनेक महिलांचा स्त्री शक्ती पुरस्कार देऊन सन्मानित केल्याने शहरातील महिलांच्या वतीने आराध्या फाऊंडेशन अध्यक्ष नितीन काळे यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नुकतीच ३ जानेवारीला सर्वत्र महिलांना शिक्षणाचा हक्क देणारे, महाराष्ट्रात पहिली मुलीची शाळा काढणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची जयंती विविध कार्यक्रमाने संपन्न झाली अशात याच दिनाचे औचित्य साधून शहरातील सामाजिक धार्मिक कार्यक्रमात नेहमीच अग्रेसर असणारी आराध्या फाऊंडेशन वतीने रविवारी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा जंगी सत्कार घेण्यात आला, छत्रसाल नगरातील शाळा क्रमांक १८ येथे महिला सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात आशा वर्कर महिला भजन मंडळ सह अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना स्त्री शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आल. कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, कौशल्य विकास सहायक आयुक्त प्राजक्ता बारसकर, स्त्री कायदा विश्लेषक ऍड योगिता पाटेकर. पदमजा प्रफुल वंदे गुंजन गोळे सिटी न्यूज प्रतिनिधी अजय शृंगारे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा नितीन काळे यांच्या सह मित्र परिवार वतीने सन्मान करण्यात आला. तर मान्यवरांच्या हस्ते उलखेनीय कार्य करणाऱ्या महिलांना स्त्री शक्ती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी अमर छत्रसाल नगर सह इतर परिसरातील शेकडो महिला उपस्थित होत्या, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर प्रकाश टाकून आजच्या महिलांनी सुद्धा सावित्रीबाईंचा बोध घ्यावा असे आपल्या भाषणातून आवाहन केले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान केल्याने अनेक क्षेत्रातून आराध्या फाऊंडेशन चे अध्यक्ष नितीन काळे आणि मित्रपरिवारावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



