पिंपळविहीर येथील नागरिकांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आमरण उपोषण

नागपूर मार्गावर असलेल्या पिंपळविहीर या गावातील जमिनी 40वर्षापासून वाहत असताना आता पर्यत शासनाने नोंदी केल्या नाही.. त्याच जमिनी शासनाने परस्पर एमआयडीसी ला विकल्याचा आरोप करीत आता न्याय मिळावा करिता अन्याय ग्रस्त शेतकऱ्यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली.. राज्य लाल बावटा या संघटनेने साथ दिली असून पारधी समाज बांधवानी आमरण उपोषणास सुरुवात केली. अमरावती जिल्ह्यातील पिंपळविहीर गावातील पारधी कुटुंबानी प्रशासना च्या विरोधात आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.. त्यांच्या जमिनी प्रशासनाने परस्पर तेथील एम आय डी सी ला विकल्याचा आरोप केला आहे आता उपोषणाची दखल जिल्हाधिकारी घेऊन पारधी समाजाला न्याय मिळेल का हे आता पाहणे गरजेचे ठरणार आहे. पिंपळविहीर येथील पारधी समाजातील नागरिकांनी 4 जानेवारी पासून अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आमरण उपोषण सुरू केले या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य लाल पावटा शेतमजूर युनियन करत आहे. गेल्या चार दशकांपासून या समाजाने शासनाच्या जमिनीवर कष्ट करून आपला उदरनिर्वाह केला. मात्र, या 40 वर्षात जमिन वाहत असलेल्या लोकांच्या नोंदी कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने घेतल्या नाही. आता या जमिनी शासनाने परस्पर एमआयडीसीला विकल्या आहेत त्यामुळे या जमिनीच्या भरवशावर उदर निर्वाह असलेल्या या कुटुंबियांवर उपास मारीची वेळ आली आहे. या जमिनीवर सुरू असलेल्या विकासकामांमुळे पारधी समाजाच्या अनेक कुटुंबांचे घर उघड्यावर आले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वननिवासी कायदा, 2006 अस्तित्वात असूनही आम्हाला हक्काचे पट्टे मिळाले नाहीत. आमच्या हक्काची जमीन आम्हाला मिळावी, अन्यथा जमीनविक्रीच्या बाजारभावानुसार योग्य मोबदला द्यावा अशी मागणी आज 4 जानेवारी रोजी उपोषण कर्त्यांकडून करण्यात येत आहे.



