AmravatiLatest News

क्रोधाग्नि कादंबरीचा प्रकाशन सोहळा अभियंता भवन येथे

अमरावती :- सृजन साहित्य संघ व संवेदना बहुद्देशीय संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला अभियंता भवन येथे झालेल्या या कार्यक्रमात डॉ श्यामसुंदर लिखित क्रोधाग्नि कादंबरीचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला . या कार्यक्रमात डॉ श्यामसुंदर निकम यांनी मनोगत व्यक्त केलं.

डॉ.श्यामसुंदर लिखित क्रोधाग्नि या कादंबरीचा प्रकाशन सोहळा अभियंता भवन येथे घेण्यात आला.सृजन साहित्य संघ व संवेदना बहुद्देशीय संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने सोहळा आयोजित करण्यात आला. जेष्ठ कवयित्री डॉ प्रभा गणोरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात जेष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डाहाके यांच्या हस्ते कादंबरीचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी जेष्ठ साहित्यिका प्राचार्य डॉ शोभा रोकडे, प्राचार्य डॉउद्धव जाने भाष्यकार म्हणून उपस्थित होते. दैनिक हिंदुस्थानचे प्रबंध सम्पादक विलास मराठे, दै अमरावती मंडलचे अनिल अग्रवाल, जेष्यच समाजसेवक गोविंद कासट प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रकाशन सोहळ्यानंतर डॉ श्यामसुंदर निकम यांनी मनोगत व्यक्त केलं. डॉ निकम यांनी पतझड ,लढा,या कादंबऱ्यांसह कविता संग्रहदेखील प्रकाशित झाले आहेत. कार्यक्रमाला जोत्सना निकम, डॉ अमित निकम, डॉ प्रितीश निकम, रहित निकम समृद्धी निकम यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

डॉ. श्याम सुंदर निकम यांचा डॉक्टरी पेशा आहे . अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात श्याम सुंदर निकम यांनी जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून पद संभाळलंय. डॉक्टरी पेशा म्हणजे सतत रुग्ण, त्यांची सेवा , त्यात सीएस च पद म्हणजे अनेक जबाबदाऱ्यादेखील आल्या या सगळ्या कामातून निवृत्त होताना मनाची तरलता ढळू न देता डॉ श्याम सुंदर निकम यांनी लिखाण केलंय .

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button