इराण–इज्रायल संघर्षाचा परिणाम; व्यावसायिक गॅस तुटवडा, नागरिकांनी घाबरू नये – महापौर श्रीचंद तेजवाणी

अमरावती :
Iran आणि Israel या दोन देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम आता भारतातही जाणवू लागल्याचे चित्र दिसत आहे. देशातील काही भागांमध्ये व्यावसायिक गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे हॉटेल व्यावसायिक अडचणीत आले आहेत.
या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेचे महापौर Shrichand Tejwani यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, सध्या फक्त व्यावसायिक गॅस पुरवठ्यात काही अडचणी निर्माण झाल्या आहेत.
मात्र घरगुती वापरासाठी लागणाऱ्या गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
देशाचे नेतृत्व सध्याची परिस्थिती सक्षमपणे हाताळत असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. तसेच गॅसच्या नावाखाली कुठेही अनावश्यक गर्दी करू नये, असेही त्यांनी नागरिकांना सांगितले.



